Home विदर्भ तहसील कार्यालय भातकुली येथे जन आक्रोश आंदोलन

तहसील कार्यालय भातकुली येथे जन आक्रोश आंदोलन

201

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती / भातकुली -: श्रावणबाळ, संजय गांधी निराधार पगारापासून वंचित,खावटी कर्ज व विकास योजनापासून वंचित,धोरणामुळे बाधित,आपत्तीग्रस्त, अतिवृष्टी व ओला दुष्काळाने बाधित शेतकरी व मनरेगाच्या कामापासून वंचित व भातकुली कापूस उत्पादक शेतकरी व शेतमजुरांना न्याय देण्याकरिता भाजपा भातकुली तालुका व्दारा व माजी कृषी मंत्री अनिल बोनडे यांच्या अध्यक्षते खाली जनआक्रोश आंदोलन दिनांक २६ आक्टोबर रोजी दुपरला १वाजता राममंदिर ते तहसिल कार्यालय भातकुली रॅली काढून महाविकास आघाडी सरकार विरोधी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता ,या प्रसंगी त्याच्या प्रमुख मागण्या – भातकुली तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा .कापूस व सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी .पेढी प्रकल्प वासीयांना राहिलेले अनुदान त्वरित वितरित करावे व घरकुल मंजूर करावे .निराधारांचे ५ महिन्यापासूनचे थकीत अनुदान त्वरित देण्यात यावे.कोरडवाहूना सरसकट ५०,००० रु .प्रमाणे मदत मिळावी.कर्जाची सरसकट माफी करण्यात यावी व नियमित कर्ज भरणाऱ्याना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी माजी कृषी मंत्री अनिल बोनडे ,प्रवीण तायडे जि. प.सदस्य (असदपूर सर्कल), विकास देशमुख भाजप तालुका अध्यक्ष , सोपान गुडधे ओ. बी.सि. मोर्चा जिल्हाध्यक्ष अमरावती ,योगेश उघडे कैफ खान इत्यादी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते