Home विदर्भ उत्तर प्रदेश लखीमपुर खीरी घटनेच्या विरोधात अमर काळे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांचा...

उत्तर प्रदेश लखीमपुर खीरी घटनेच्या विरोधात अमर काळे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको आंदोलन

281

तळेगाव शा.पंत – रविन्द्र साखरे

वर्धा :-    उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खीरी येथे संयुक्त किसान सभेच्या वतीने मोदी सरकारने केलेल्या क‌षी कायद्याचे विरूध्द आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्याचे समुदायावर केंद्रीय राज्य गृहमंत्री अजयकुमार मीश्र यांचा मुलगा आशिष मीश्र वत्याचे सहकारी गुंडानी भरधाव गाडी शेतकऱ्याचे अंगावर घातली त्यामुळे आठ शेतकरी जागीत ठार झाली तर अनेक जखमी झाले हि घटणा भारतीय जनता पक्षाचे जनविरोधी निती मुळे जनतेत उफाळत असलेल्या जनतेचा रोष दाबण्याचे उद्देशाने ठरवून घडवीलेले हत्याकांड आहे ,शासनाचे विरूध्द आवाज उठवण्यात करिता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी जेव्हा पिडीत शेतकऱ्यांना भेटण्याकरिता यूपीच्या लखीमपुर खीरी येथे जात असताना त्यांना कोणतेही कारण न दाखवता अटक करण्यात आली होती ह्यावरून हेच सिद्ध होते की यूपी सरकार क्या सरकार विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाज बंद करा वाटेल ते झाले तरी अश्या पद्धतीने राज्यात सरकारी राज्यकरते राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम कतीत आहे.ह्या सारे पार्ष भुमीवर तळेगाव शामजी पंत येथे काँग्रेसचे माजी आमदार अमर भाऊ काळे यांच्या नेतृत्वात दिलीप भाऊ राठी , युवक काँग्रेसचे रामू राठी , मनिष शेखार, विशाल साबले व शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 6 वर रस्ता रोको रास्ता रोको आंदोलन व भाजप सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली.

मागण्या…….
१)__केंद्रीय राज्य गृहमंत्री अजय मीश्र यांना पदावरून निलंबीत करून ,हिंसा घडवणे, सांप्रदायिक विद्वेष पसरवीणे,हत्या घडवीने,इत्यादी गुन्हे दाखल करा.
२)_अजय मीश्रा यांचा मुलगा आशिष मीश्रा वत्याचे गुंड सहकारी यांचेवर भा.द वी३०२ दाखल करून अटक करण्यात यावी.
३)_सदर हत्याकांडाची चौकशी सुप्रिम कोर्टाचे नियंत्रणात एस आई टी व्दारे करण्यात यावी.