
अयनुद्दीन सोलंकी,
———————-
घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा कणाके हिला उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमाणित केल्या प्रकरणी पारवा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (r), 3 (1) (s), भादंवि कलम 504 अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी आकाश नडपेलवार यांनी यवतमाळच्या जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून सदर प्रकरणाची सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली होती. सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. नरेंद्र पांडे यांनी युक्तिवाद केला. तर आरोपी आकाश नडपेलवारतर्फे अँड. पी. व्ही. गाडबैले व अँड. ए. एम. डाखोरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. सदर प्रकरणात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांनी संशयित आरोपी आकाश नडपेलवार यांस अटक पुर्व जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत करीत असून त्यांना पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण हे तपासात सहकार्य करत आहे.
दरम्यान, चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार हा मागील चौदा दिवसांपासून फरार होता, असे समजते. तसेच या पुर्वी चिखलवर्धाचे उपसरपंच आकाश नडपेलवार व ईतर तिघें कुर्ली येथील कंट्रोल डीलर शेख शमा शेख ईकबाल हिला संगणमत करुन 6 हजार रुपयांची धमकी देउन खंडणी मागीतल्या प्रकरणी घाटंजी न्यायालयाच्या आदेशावरुन संशयित आरोपी आकाश नडपेलवार, प्रमोद यमसनवार, विलास बडगुलवार व नागोराव कुमरे आदीं विरुद्ध भादंवि कलम 384, 389, 506 व 34 नुसार पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरणात पारवा पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोरख चौधर यांनी घाटंजी येथील न्यायालयात ब वर्ग समरी फायनल सादर केला होता. मात्र, सदर प्रकरण घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) एफ. टी. शेख यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे, हे येथे उल्लेखनीय.
घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा कणाके हिला उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड हे दोघेही ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहारात सहभागी न करता सरपंच वर्षा कणाके हिचे शिक्के याचे खोट्या पद्धतीने वापर करुन चिखलवर्धा ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतले असल्याची तक्रार 5 एप्रिल रोजी सरपंच वर्षा कणाके हीने यवतमाळ येथील जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात केली होती. तथापि, 13 सप्टेंबर रोजी चिखलवर्धा गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने रात्री सरपंच वर्षा कणाके यांचेकडे गावातील काही स्त्री पुरुष हे गावात पाणी टंचाई असल्याची तक्रार घेऊन आले होते. त्यामुळे 14 सप्टेंबर रोजी सकाळी सरपंच वर्षा कणाके, ग्रामपंचायत सदस्या कुसुम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या योगिता आत्राम हे तिघेही मिळून प्राथमिक मराठी शाळेजवळुन गावात जात होते. तेवढ्यात उपसरपंच आकाश नडपेलवार हा गावातून बस स्टँड कडे जात होता. या वेळी सरपंच कणाके हिने उपसरपंच नडपेलवार यांस चिखलवर्धा येथील प्राथमिक मराठी शाळेजवळ थांबवून तिने पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 10 मार्च रोजीच्या दाखल केलेल्या ठरारावर सरपंच नसतांना, सरपंचाची खोटी सही व खोटा व बनावट रबर स्टॅम्प कां मारला अशी विचारणा केली, त्यामुळे उपसरपंच आकाश नडपेलवार हा चिडून गेल्याने सरपंच वर्षा कणाके हिला सार्वजनिक ठिकाणी जातीवर, जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. तसेच तुझ्याशी जे होते ते करं म्हणुन अशा आशयाची धमकी दिली. अशी लेखी तक्रार पारवा पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे ई-मेल व रजिष्टर पोष्टाने दाखल केली होती, हे येथे उल्लेखनीय. दरम्यान, चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा कणाके हिने संशयीत आरोपी आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात २ आँक्टोंबर रोजी पुन्हा एक तक्रार दाखल करुन त्यात आकाश नडपेलवारच्या कुटुबियांनी आमच्या कुटूबियांना जिवानिशी मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप सरपंच वर्षा कणाके हिने केला असून, स्वतः सरपंच नसतांना आकाश नडपेलवार यांनी सबंधित ठरारावर उपसरपंचाचा शिक्का मारून उप हे शब्द खोडून सरपंचचाच्या ठिकाणी खोटी व बनावट सही केल्याचा तसेच सदरचा ठराव ग्रामसेवक पी. सी. दौड यांच्या हस्ताक्षरात लिहलेला असल्याची लेखी तक्रार पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीमुळे घाटंजी तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.










































