
मनीष गुडधे
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
अमरावती – आज होणाऱ्या आरोग्य विभागाची गट क व गट ड परीक्षा वेळेवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहेत,मग प्रश्न हा आहे तुमच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ज्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना का देता.ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि दूर अंतरावरील जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले आहेत ते विद्यार्थी कालच् शहरात दाखल झाले आहेत. मग आता त्यांचे तिकिटाचे राहण्याचे व इतर खर्च आरोग्य विभाग देणार का. सोबत झालेले हेलपाटे नाहक मनस्ताप याला जबाबदार कोण जर आरोग्य विभागाला परीक्षा रद्द करायची होती तर एक दिवस अगोदर त्याचे रजिस्टर बने सर्व विद्यार्थ्यांना मीडियाद्वारे प्रश्नपाठविण्यात यायला हवी होती.










































