
रावेर (प्रतिनिधी)
ज्ञान मिळवण्याचा प्रवास आईच्या मांडीपासून थडग्या पर्यंत विस्तारलेला आहे. हा प्रवास औपचारिक किंवा अनौपचारिकरीत्या सुरूच राहिला पाहिजे. अलफलाह केंद्राच्या सर्व कामगिरी आणि प्रशासकीय बाबींची तपासणी केल्यानंतर,विद्यापीठाने केंद्राला मान्यता दिली होती. अल- फलाह एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी मालाडला एम.ए उर्दूसाठी पदवी महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली आहे. या निमित्ताने उर्दू टाइम्सचे जेष्ठ पत्रकार मुहम्मद रफिक शेख, यांनी संस्थेच्या सरचिटणीस अखलाक अहमद यांच्याशी चर्चा केली.अखलाक अहमद यांनी प्रथम अल्लाहचे आभार मानले आणि सांगितले की शाळा आणि केंद्रा च्या शिस्त, शिक्षणाची गुणवत्ता आणि उत्कृष्ट निकालां ची परंपरा हे त्याचे एकमेवम कारण आहे. म्हणूनच संस्थाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानमिळवलेले आहे .याप्रसंगी आनंद व्यक्त करत ते पुढे म्हणाले की, हे यश प्राचार्य मुहम्मद ताहिर शाह आणि समन्वयक सय्यद शरीफ यांच्या मेहनतीचे फळ आहे, जे त्यांनी त्यांच्या निस्वार्थ सेवेद्वारे साध्य केले आहे.
या कामगिरीवर प्राचार्य मुहम्मद ताहिर शाह साहिब म्हणाले की, उर्दू भाषिक वर्गासाठी उच्च शिक्षण घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.अखेर समन्वयक सय्यद शरीफ यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, दरवर्षी शेकडो विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, मुंबई महानगरपालिकेचे शेकडो शिक्षक आणि सरकारी संस्था उर्दूमधून पदवी घेत होती आणि त्यांची शैक्षणिक क्षमता वाढवत होती. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी विद्यापीठाने खूप चांगले स्त्रोत दिले आहे. प्रत्येकाला या सुविधेचा लाभ मिळाला पाहिजे. दूरस्थ शिक्षणाद्वारे, शिक्षक, कार्यालयात काम करणारे तरुण, विद्वान आणि घरगुतीमहिला एक सुवर्ण संधी विद्यापीठाने दिली आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. हीच अपेक्षा आहे.











































