Home विदर्भ सोनार दुकानफोडी करणारी टोळी निष्पन्न करून १ आरोपीस अटक २ आरोपी चे...

सोनार दुकानफोडी करणारी टोळी निष्पन्न करून १ आरोपीस अटक २ आरोपी चे शोध चालू

314

रवींद्र साखरे

वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथील रहिवासी हेमंत दादाजी नागपुरे, यांचे गुरूश्री ज्वेलर्स दुकानाचे शटर वाकवुन दिनांक 08/ व 09/07/2021 चे रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 किलो वजनाचे चांदीचे दागिने, नगदी 5000 रू. व डिव्हीआर मशिन कि. 5000 रू. असा एकूण किंमत 2,76,670 रू. चा माल चोरून नेला असुन त्याबाबत पो.स्टे. वडनेर येथे अपराध क्र. 172/2021 कलम 457, 380 भादंवि. चा गुन्हा नोंद असुन तपास केले असता

सदर गुन्हा करण्याकरीता आरोपीनी इको कार क्र. एम.एच. 46/बि.व्ही. 2810 हिचा वापर केल्याचे आढळुन आले. म्हणुन सदर वाहनाचा घटनास्थळापासुन शोध घेण्यात आला असता, आरोपीतांनी हिंगणघाट येथुन फोर व्हीलर कारच्या 3 वेगवेगळया नंबर प्लेट चोरून त्यापैकी एम.एच. 32/वाय. 3795 ची नंबर प्लेट बदलवुन त्यांनी नागपुर येथे जावुन दिनांक 09/07/2021 ते 10 चे रात्री भंडारा जिल्हयातील मौदा व जवाहरनगर येथे सोनाराचे 5 ते 6 दुकाने फोडुन चांदीचा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदरचा गुन्हा करून नमुद इको कार ही कोणत्या मार्गाने पुढे गेली, याचा सातत्याने शोध घेतला असता, सदरची गाडी ही हिंगणा-सेलु-वर्धा-देवळी-यवतमाळ मार्गे नांदेड गेल्याचे तपासात आढळुन आले. नांदेड येथे सदर वाहनाचा शोध घेतला असता, दिनांक 14/07/2021 रोजी सदरचे वाहन नांदेड येथील रेल्वे स्टेशन रोडवरील विसावा गार्डन जवळ बेवारस स्थितीत आढळुन आले. त्यामुळे तेथुन सदरचे वाहन जप्त करण्यात आले. वाहनाची तपासणी नांदेड येथील अंगुलीमुद्रा तज्ञाकडुन करण्यात आली. पुढील तपास केला असता, सदर गुन्हयात आरोपी नामे 1) पंकजसिंग कालुसिंग दुधानी रा. अंबरनाथ जि. ठाणे, पो.स्टे. अंबरनाथ, मुंबई 2) शिवासिंग विरसिंग सिकलकर रा. आंबीवली, इराणी वस्ती, पो.स्टे. खडकपाडा जि. ठाणे, मुंबई 3) विरमंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधानी, रा. गुरूनानक नगर बिजापुर, रेल्वे स्टेशनजवळ, कर्नाटक, ह.मु. झरी, ता. जि. परभणी व त्यांचा एक साथीदार असे आरोपी निष्पन्न झाले. सदर आरोपीतांचा शोध घेणेकरीता दिनांक 11/08/2021 रोजी पोउपनि. गोपाल ढोले यांचे सह तपास पथक मुंबई व ठाणेकरीता रवाना करण्यात आले. सदर पथकाने दिनांक 22/08/2021 पर्यंत सदर आरोपीतांचा ठाणे, अंबरनाथ, आंबिवली, नांदेड, परभणी परिसरात सतत षोध घेतला. परंतु वरील आरोपीतांपैकी आरोपी पंकज दुधानी व शिवासिंग सिकलकर हे मिळुन आले नाही. त्यानंतर आरोपी विरमंगलसिंग उर्फ डॉनसिंग दुधानी हा मौजा झरी, ता.जि. परभणी येथे असल्याची गुप्त माहीती मिळाली. म्हणुन दिनांक 22/08/2021 रोजी त्याचे घरी जावुन शोध घेतला असता, तो घरीच हजर मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवुन पुढील तपास करण्यात आला. त्या दरम्यान सदर आरोपी विरमंगलसिंग उर्फ डॉनसिंग दुधानी याने त्याचे इतर साथीदार पंकज दुधानी, शिवासिंग सिकलकर व एक साथीदार यांनी मिळुन प्रथम दिनांक 05/07/2021 रोजी रायगड जिल्हयातील पो.स्टे. रसायनी हद्दीतुन इको कार क्र. एम.एम. 46/बि.व्ही. 2810 ही चोरून त्या कारचा वापर करून दिनांक 08/07/2021 ते 09/07/2021 चे रात्री दरम्यान वडकी जि. यवतमाळ येथील किराणा दुकान व वडनेर येथील सराफा दुकानाचे शटर वाकवुन दुकानात प्रवेश करून त्यातील ऐवज चोरून नेला. त्यानंतर दिनांक 09/07/2021 व 10/07/2021 चे रात्री दरम्यान नागपुर जिल्हयातील मौदा, भंडारा जिल्हयातील जवाहरनगर, लाखणी व साकोली येथील सराफा दुकान फोडुन त्यातील ऐवज चोरून सदर कारने पुढे नांदेड पर्यंत प्रवास करून ती गाडी नांदेडच्या रेल्वे स्टेशनजवळ सोडुन तेथुन पुढे पसार झाल्याचे आढळुन आले. त्यानंतर दिनांक 05/08/2021 ते 06/08/2021 दरम्यान पो.स्टे. लाखणी व साकोली जि. भंडारा हद्दीतील सराफा दुकान फोडल्याचे सुध्दा तपासात दिसुन येत आहे.
आरोपी विरमंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधानी रा. गुरूनानक नगर, बिजापुर, कर्नाटक ह.मु. झरी ता. जि. परभणी यास दिनांक 23/08/2021 रोजी 14.23 वा. रितसर अटक करून संबंधीत कागदपत्रांसह पो.स्टे. वडनेर यांचे स्वाधीन करण्यात आले आहे. सदर अटक आरोपीकडुन पुढील तपास सुरू असुन गुन्हयातील मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
पोउपनि. गोपाल ढोले, स्था.गु.शा वर्धा यांचे अधिनस्त तपास पथकाने दिनांक 10/07/2021 ते 23/07/2021 व दिनांक 11/08/2021 ते 23/08/2021 पावेतो 2 टप्प्यांमध्ये 25 दिवस सतत तपास करून सदरची दुकानफोडी करणारी टोळी निष्पन्न केली आहे. त्यांचेकडुन वर्धा, यवतमाळ, भंडारा येथील सराफा दुकान फोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपी हे वारंवार सराफा व इतर दुकानफोडीचे गुन्हे करण्याचे सवयीचे असुन त्यांचेविरूध्द ठाणे जिल्हयात पो.स्टे. कल्याण, उल्हासनगर, खैरवाडी, महात्मा फुले, कोळसेवाडी, पो.स्टे. औरंगाबाद, पो.स्टे. चर्तुश्रृंगी, पुणे, नागपुर जिल्हयातील कोंढाळी, अमरावती जिल्हयातील चांदुर बाजार व वर्धा जिल्हयातील कारंजा येथे गुन्हे दाखल असुन न्यायप्रविश्ट आहेत. सदर आरोपीतांविरूध्द नागपुर, पुणे व औरंगाबाद येथे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा अन्वये गुन्हे नोंद असुन न्यायप्रविष्ठ आहेत.
सदरची कामगिरी मा. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. निलेश ब्राम्हणे पो.नि. स्था.गु.शा. वर्धा यांचे मार्गदर्शनात पोउपनि. गोपाल ढोले, पोहवा. निरंजन वरभे, गजानन लामसे, हमीद शेख, रणजित काकडे, यशवंत गोल्हर, मनिश कांबळे, रामकिसन इप्पर, पवन पन्नासे, अभिजीत वाघमारे, गोपाल बावणकर, नवनाथ मुंढे, अमोल ढोबाळे व सायबर सेलचे दिनेश बोथकर, अनुप कावळे, अंकित जिभे यांनी केली आहे.