Home विदर्भ आरोग्य उपसंचालकांच्या दालनाला लावले रक्ताने लिहलेले निवेदन..

आरोग्य उपसंचालकांच्या दालनाला लावले रक्ताने लिहलेले निवेदन..

337

जिल्ह्यातील बॉगस पॅथॉलॉजी लॅब विरोधात निरज वाघमारे आक्रमक.


यवतमाळ – सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गजन्य आजराने सर्वत्र हाहाकार माजविल्याने जनसामान्यात आरोग्याला घेऊन काळजी वाढली आहे. त्यामुळे क्षुल्लक आजारांची लक्षणे वाटल्यानंतर सामान्य जनता दवाखान्याची वाट धरत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत जिल्ह्यातील डॉक्टरांच्या संगनमताने बोगस पॅथॉलॉजी लॅब चालकांनी सामान्यांची आर्थिक लूट चालविण्याचा प्रकार शहरासह जिल्ह्यात चालू आहे.  आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील बोगस लॅबवर चाप लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात याकरिता स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी आज अकोला विभागाच्या आरोग्य उपसंचालकांना स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून ही मागणी केली. परंतु सदर अधिकारी आपल्या दालनात हजर नसल्याने हे निवेदन त्यांच्या दालनाच्या प्रवेशद्वाराला चिपकवण्यात आले. 

               जिल्ह्यात  १०० च्यावर असलेल्या ज्यांच्या अस्तित्वाची कुठेच नोंदही नाही असे बोगस पॅथॉलॉजी लॅब चालक सामान्यांची आर्थिक लूट करत आहे.  सदर पॅथॉलॉजी लॅबला कुठल्याही विभागाची परवानगी नसतांना सामान्यांच्या आरोग्याशी खेळत ह्या लॅब चालू आहे.  या लॅब मध्ये होणाऱ्या चाचण्या ज्या डॉक्टर व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि निदर्शनाखाली करावयाच्या असतात त्या सुद्धा होत नाही. तर ह्या चाचण्या दहावी – बारावी व डीएमएलटी उत्तीर्ण व या क्षेत्रातील सामान्य पदवी प्राप्त व बोगस पदवी प्राप्त विद्यार्थ्यांकडून केल्या जात असल्याने या चाचण्या खात्रीशीर असणार का ही शंका नक्की उपस्थित होते. आणि या लॅबसाठी नियंत्रक म्हणून ज्या पदवी प्राप्त डॉक्टर ( एमबीबीएस किंवा एमडी पॅथ ) असायला पाहिजे, तेच इथे स्थिरस्थावर नसून कुठेतरी इतरत्र काम करत असलेल्या, डॉक्टरांच्या कागदपत्रांवर ह्या बोगस लॅब चालू आहेत.  सदर बोगस पॅथॉलॉजी लॅब चालकास याविषयी विचारणा केल्यास आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. अशी छातीठोकपणे उत्तरे देतात, त्यामुळे यांच्याशी आरोग्य  विभागाची आर्थिक देवाण – घेवाण असून, यांना बोगस कारभार करण्यास अभय मिळत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. शहरात काही नामांकित डॉक्टरांनी आपल्याकडील आलेल्या रुग्णाला  रक्त कळव इतर चाचण्यासाठी इतरत्र न पाठवता आपल्याच रुग्णालयात बोगस रित्या लॅब चालू करून हा गोरखधंदा चालविला आहे. यासंबंधी जिल्ह्यातील सर्वोच्च असलेल्या आरोग्य यंत्रणेचे घटक असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक आरोग्य प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार केल्या नंतर हा मुद्दा आमच्या संबंधित नाही. असे उत्तर मिळाल्यानंतर  स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी हा मुद्दा आता अकोला विभागाच्या आरोग्य उपसंचालकाच्या दरबारात मांडला आहे. 

     ह्या बाबीत आता स्वतः आरोग्य उपसंचालक ह्यांनी हस्तक्षेप करून या लॅब चालकांवर कठोर कारवाई करावी ह्यासाठी निरज वाघमारे यांनी आज अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालय गाठून स्वतःच्या रक्ताने लिहलेले निवेदन उपसंचालक देण्यात येणार होते. मात्र यावेळी आरोग्य उपसंचालक हजर नसल्याने हे निवेदन आरोग्य उपसंचालकाच्या दालनाच्या दारास हे निवेदन लावून आपली मागणी उपस्थित केली….