Home मराठवाडा देशातील शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे...

देशातील शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन

220

जालना – लक्ष्मण बिलोरे

केंद्र सरकारच्या वतीने शेतीत मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.शेती तोट्यात राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक लक्ष शेतकऱ्यांवर असल्याने निश्चितच देशातील शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ता.१९,गुरुवारी रोजी जाफराबाद येथे केले.
मंत्रीपदी बढती मिळाल्याने रावसाहेब दानवे यांचा जाफराबाद तालुका भाजपा तर्फे सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.आमदार संतोष दानवे,तालुका अध्यक्ष सुरेश दीवटे, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विजय परिहार आदी यावेळी उपस्थित होते.दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचा उपयोग करण्याची गरज आहे.शेतातील उत्पादीत मालाला जीथे चांगला भाव मिळतो तीथे तो विकण्याचे स्वातंत्र्य नवीन कायद्यानुसार देण्यात आले आहे.
दानवे रेल्वे राज्यमंत्री झाल्यामुळे जाफराबाद तालुक्याची मान उंचावली असल्याचे तालुकाध्यक्ष सुरेश दीवटे म्हणाले.दहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी दिल्लीत जावून दानवे यांची भेट घेतली.हिच खरी त्यांची कमाई आहे.आता गाव पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आमदार संतोष दानवे म्हणाले.परिहार यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उध्वव दुनगहू यांनी केले.