Home विदर्भ आलेगाव ग्रा पं कार्यालया समोर स्वातंत्र्य दिन साजरा

आलेगाव ग्रा पं कार्यालया समोर स्वातंत्र्य दिन साजरा

231

अकोला / आलेगाव , (  प्रतिनिधीी ) –  भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आलेगाव ग्रा पं प्रशासनाने मोठ्या उत्साहात साजरा केला.


पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आलेगाव ग्रा पं प्रशासनाने भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिनी ग्रा पं सरपंच गोपाल गणपतराव महल्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रीय ध्वजास मानवंदन देण्यासाठी आलेगाव ग्रा पं प्रशासनाने येथील माजी सैनिक,पोलीस पाटील,माजी पोलीस पाटील,आजी, माजी, सरपंच, उपसरपंच,डॉ तसेच ग्रा पं माजी सद्स्य तसेच जिल्हा परिषद शिक्षक,महसूल अधिकारी कर्मचारी,पोलीस चौकीचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ व पत्रकार मंडळी आदींना आमंत्रित केले होते उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय राष्ट्र ध्वजास मानवंदना देऊन राष्ट्र गाणं आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. या वेळी ग्रा पं उपसरपंच रियासतबी जलालोद्दीन ग्रा पं सद्स्य अमर दिलीप तेलगोटे,म.आसिफ,म.सिद्दीक,गोपाल दिनकर पाटील,जुलेखाबी अजिजुद्दीन,सौ सपना रवींद्र मुर्तडकर,अर्षदअंजुम अमजदखा,शहणाजबी रेहणूल हक,उमाबाई धम्मसिल तेलगोटे,अशोक देवकते(ग्रामविकास अधिकारी )व ग्रा पं कर्मचारी गण व ग्रामस्थ उपस्थित होते.