
वनविभागाचे दुर्लक्ष , सर्वांत पुढे वन विभाग माझा

देवानंद जाधव – विशेष प्रतिनिधी
यवतमाळ – वन विभागा अंतर्गत ,ऊत्तर आर्णि वनपरीक्षेञाच्या शिरपुर बिट मधील कक्ष क्रमांक ३२० असलेल्या मौजा महाळुंगी येथील सर्व्हे नंबर १० मध्ये, वनजमिनीवर अतिक्रमण करुन वन कर्मचा-यांनी चक्क प्रशस्त ईमारत बांधली असल्याचा धक्कादायक प्रकार ऊजेडात आल्याने, वन विभागात खळबळ माजली आहे. आर्णि वन विभागाने, वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमण धारकांची जी यादी जारी केली, त्या यादी मध्ये क्रमांक ४८वर प्रेमसिंग धुमा जाधव रा.महाळुंगी यांनी ३७८ चौरस मिटर वनक्षेञावर अतिक्रमण केले असल्याचे
स्पष्टपणे नमुद केले आहे. त्याच वनजमिनीवर अतिक्रमण करुन पक्की ईमारत बांधली हे विशेष. अतिक्रमण धारक प्रेमसिंग धुमा जाधव यांची दोन मुले वन विभागात नोकरी करतात ,आशुतोष हा पांढरकवडा वन परीक्षेञात आणि दादेश प्रेमसिंग जाधव हा धारणी वन परीक्षेञात कार्यरत आहेत .या दोन्ही भावंडानी ऊत्तर आर्णि वन विभागातील वनपरीक्षेञ अधीकारी, क्षेञ सहाय्यक, वनरक्षक, आणि सबंधीत वन कर्मचा-यांना *बाजरा* देऊन वडीलाच्या नावे प्रशस्त ईमारत बांधली आहे. या गंभीर बाबीकडे यवतमाळ ऊपवनसंरक्षक जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वसंतराव नाईक विकास महामंडळ मुंबई चे माजी संचालक अनिल विजयसिंह नाईक यांनी केला आहे. कक्ष क्रमांक ३२०मध्ये मौजा महाळुंगी व मौजा चिकणी मधील क्षेञ मिळुन २८२.५६ हेक्टर क्षेञ आहे. त्यापैकी ९९.८६ हेक्टर क्षेञ ईतर विभागास हस्तातरित केल्याची नोंद कार्य आयोजने मध्ये आहे. त्यामुळे शिल्लक क्षेञ १८२.२७ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्याचा खुद्द वन विभागाचाच अहवाल आहे. तरीही अतिक्रमण हटावो या शासन निर्णयाची अंमलबजावणी वन विभागा कडुन राबवली जात नाही. त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. वन जमिनीवरील कच्ची पक्की घरे आणि जंगलातील अतिक्रमण विनाविलंब हटवुन संपुर्ण रान मुक्या जनावरांसाठी मोकळे करुन दोषीवर वन कायद्यानुसार कडक कारवाई करावी. अन्यथा कर्तव्यात कसुर करणा-या, आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणा-या, सबंधीत वन अधिकारी आणि कर्मचारी यांचे विरोधात मुंबई ऊच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचीका दाखल करण्याचा ईशारा अनिल नाईक यांनी दिल्याने आर्णि ऊत्तर वनपरीक्षेञात खळबळ माजली आहे.










































