
यवतमाळ : भारतीय जैन संघटना शहर शाखा यवतमाळ, तसेच ललीत जैन मित्र परिवार च्या वतीने 16 जुलै रोजी आराधना भवन येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठे शस्त्र मानले जात आहे. त्यामुळे लसीकरणाला गती देण्यासाठी प्रशासनातर्फे जिल्हाभरात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जैन संघटना शहर शाखा यवतमाळ व ललित जैन मित्र परिवारा तर्फे समाज बांधवांच्या लसीकरण सुरळीत व्हावे याकरिता आराधना भवन येथे विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 200 समाज बांधवांना कोविशिल्ड लस देण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत शिबिर पार पडले. दिव्यांग तसेच वयोवृद्धांना या शिबिरात प्राधान्य देण्यात आले. डॉ रमेशचंद्र खिंवसरा यांच्या मार्ग दर्शनात एएनएम आरती राठोड, अर्चना कातोरे, जेंएनएम अभिषेक खडसे, आशा सेविका कल्पना मरकवडे, मनिषा बंसोडे व डाटा एंट्री ऑपरेटर शुभम खडतकर लसीकरण सुरळीत पार पाडले. लसीकरण शिबिर आयोजनासाठी तहसीलदार कुनाल झालटे, तालुका आरोग्य अधिकारी सुषमा खोडवे यांनी सहकार्य केले. तसेच शिबिरासाठी ललित जैन, शुभम खिवसरा हर्ष भरुट, कूशल लड्डा नागोरवाला, डॉ ऋषभ बोरा यांनी परिश्रम घेतले.










































