Home विदर्भ उपोषणाची सांगता व कृतीसमितीचे गठन….

उपोषणाची सांगता व कृतीसमितीचे गठन….

183

यवतमाळ / राळेगाव –  स्थानिक राळेगाव शहरात, “महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित राळेगाव” नावाने नवीन उपक्रम चालविण्यासाठी व लोकांना बचतीचे धडे देण्यासाठी एक पतसंस्था उदयास आली. शहरात अल्पावधीत या पतसंस्थेच्या माध्यमातून मोलमजुरी करणाऱ्या गरिबां पासून छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत बचत करण्याच्या आशा प्रफुल्लित झाल्या. व ही पतसंस्था नामांकित झाली. काळाची नजर लागावी तसं या पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक यांच्या डोळ्यात गोरगरीब मजूर शेतकऱ्यांच्या गुंतवणुक, छोट्या-मोठ्या ठेवी च्या माध्यमातून करोडो रुपयाच्या स्वरूपात पतसंस्थे कडे गंगाजळी निर्माण झालेली सलायला लागली. व झालेही तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालकांनी आपापल्या मर्जीतील लोकांना नातेवाईकांना लाखोच्या स्वरूपात न वसूल होणारे कर्जवाटप केले. व स्वतःहा सुद्धा अवाढव्य पैशांची उचल केली. काही दिवसातच सन 2014 च्या दरम्यान या पतसंस्थेचे दिवाळे निघाले व पतसंस्था डबघाईस आली. गोरगरीब मजूर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूला वाट नव्हती. काटकसर करून छोटी मोठी बचत करणाऱ्या कामगार महिलेच्या डोळ्यातून अश्रू ढसाढसा वाहत होते. तेव्हाच पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक याच ठेवीदारांच्या पैशात मस्तीत रंगलेले होते. शेवटी तक्रारी झाल्यात थातूरमातूर कायदेविषयक कारवाई म्हणून पतसंस्थेचे अध्यक्ष सौ लता विनोद वनकर व त्यांचे संचालक मंडळ यांचेवर अपराध क्रमांक ९५/१४ कलम ४२०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला परंतु काय एवढ्या कारवाईने जवळपास तीन कोटी रुपयाच्या ठेवीदारांना त्यांचा पैसा परत मिळाला ? नक्कीच नाही. तो वाद आतापर्यंत अविरत सुरू आहे. यात कित्येक ठेवीदार मृत्यू पावले असून पै पै जमा करणार्‍या कित्येक ठेवीदारांच्या आशा-आकांक्षा संपुष्टात आल्या. याच ठेवीदारांच्या युद्धाचा एक भाग म्हणून, प्रलंबित पडलेल्या या प्रकरणाला उजाळा देण्यासाठी दिनांक ७ जुलै २०२१ पासून काही ठेवीदारांना कडून राळेगाव येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. या उपोषणाच्या मागण्या होत्या. पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांना तात्काळ अटक करण्यात यावी. समस्त संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून ठेवीदारांना अग्रक्रमाने पैशांचा वाटप करण्यात यावा. एकंदरीत सखोल चौकशी करण्यासाठी उपोषण मांडण्यात आले होते. या उपोषणाची सांगता काल दिनांक 14 जुलै रोजी मा. रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यवतमाळ. यांच्या ठोस आश्वासनानंतर झाली. आज दिनांक 15 जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांचे दालनात या समस्त उपोषणकर्त्यांसह राळेगाव चे सहाय्यक निबंधक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन, त्या बैठकीत पतसंस्थेने वाटप केलेला कर्जदारांकडील कर्ज वसुली करण्यासाठी, संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी, पैशाची वसुली करण्यासाठी, अधिकृत कृती समितीचे गठन करण्यात आले. या कृती समितीचे अध्यक्ष मा. कैलास खटारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राळेगाव हे असणार आहेत. तर सचिव सचिन पिसाळकर, प्राधिकृत अधिकारी महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित राळेगाव, हे असतील. या कृती समितीमध्ये एकूण सात कार्यकारी सदस्य – उमेश मेश्राम सामाजिक कार्यकर्ते, वसंत कोमेजवार, अनिल नगराळे, दीपक कोडापे, प्रभाकर एकोणकर, गोपाल मशरू, दिक्षा नगराळे, ज्योती मेश्राम. यांना नियुक्त करण्यात आले आहे. सदरील समिती मा. रमेश कटके जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांचे दिशानिर्देशनात काम करणार आहे.