Home मराठवाडा श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान येथे पत्रकारांची सदिच्छा भेट

श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान येथे पत्रकारांची सदिच्छा भेट

464

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान मध्ये स्वामी बालकानंद सरस्वती महाराज यांच्या आश्रमात शनिवारी,१० जून रोजी पत्रकारमित्र एकत्र आले.आश्रमातील प्रसन्न वातावरण आणि सुव्यवस्था पाहून पत्रकारांनी समाधान व्यक्त केले श्री बालकानंद सरस्वती महाराज, रामपुरी संस्थानचे अद्वैतानंदजी महाराज यांच्या उपस्थितीत मुद्रेगावात पत्रकारमित्र सुदर्शन राऊत यांच्या समृद्धी न्यूज चॅनलचे उद्घाटन झाले.त्यानंतर स्वामिजींच्या आश्रमात पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.येथे आध्यात्मिक विषयावर चर्चा करण्यात आली. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील
युवा पत्रकार गोपाल भैय्या चव्हाण, दैनिक महाभारत चे पत्रकार लक्ष्मण बिलोरे, दैनिक पुढारी चे पत्रकार अशोक कंटुले,न्यूज नेटवर्क चॅनलचे पत्रकार देवराज कोळे, अशोक तौर, आदींचा श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांतर्फे सत्कार सन्मान करण्यात आला.