
अमरावती - ➡️ मंगरुळ दस्तगिर पोलीस स्टेशन चे नवनियुक्त दबंग पोलीस अधिकारी यांचा पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे महाराष्ट्र राज्य अध्यक्षा तर्फे सन्मानित करण्यात आले.

पोलीस मिञ परिवार समन्वय समिती नेहमी प्रशासकीय कणखर पोलीस अधिकाऱ्यांची दखल घेते.याचेच औचित्य साधुन मंगरुळ पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजु झालेले दबंग व कणखर पोलीस अधिकारी सुरजजी तेलगोटे साहेब,ए.पी.आय व प्राणिल पाटिल साहेब पी.एस.आय.यांचा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपालजी उमरे व बाबारावजी इंगोले धामणगाव रेल्वे तालुका विभागिय प्रमुख,सम्यक उमरे,विदर्भ युवा सचिव,विघ्ने बोरगाव निस्ताने पोलीस पाटिल,विशाल बांते पोलीस पाटिल निभोंरा (बोडखा),गजानन कांबळे धामणगाव ता.वर्कींग मेंबर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी समितीच्या कार्याबाबत माहिती,कायदा सुव्यवस्था,युवकांना मध्ये कायद्याची जागृती,व पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडे लावा,झाडे जगवा असे उपक्रम पोलीस विभाग राबवित आहे,अश्या उपक्रमा बाबत व ईतर महत्वपूर्ण विषयांवर याप्रसंगी सविस्तर चर्चा करण्यात आली.










































