Home विदर्भ तळेगावात भाजपाचे चक्काजाम आंदोलन

तळेगावात भाजपाचे चक्काजाम आंदोलन

291

इकबाल शेख – वर्धा

तळेगांव (शा.पं.) येथील राष्ट्रीय महामार्गावर टि.पांईटवर भाजपाच्या वतीने अोबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात आष्टी तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चक्का जाम
आंदोलन करण्यात आले. तळेगावात ११.३० वाजतापासुन सुरु झालेले चक्का जाम आंदोलन साधारणत: एक तासापर्यंत चालले त्यामुळे राज्यमहामार्ग व राष्टीय महामार्गाच्या दोन्ही बाजुने असंख्य वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या. या अांदोलनात आमदार दादारावजी केचे, सुरेश नागपुरे, जिल्हाध्यक्ष भाजपा अोबीसी, कमलाकर निंभोरकर आष्टी तालुकाध्यक्ष, सचिन होले वर्धा जिल्हा महामंत्री, देवानंद पेठे, तालुकाध्यक्ष अोबिसी, अशोक विजेकर, अॅड. मनिष ठोंबरे, जेष्ठ नेते उत्तमराव करांगळे, प्रशात काकपुरे, संजय ठाकरे, साै. अंकीता होले जि.प. सदस्य, भावनाताई खरडे,, रेखाताई मतले, रविभाऊ जाने तथा सर्व भाजपा आोबीसी कार्यकर्ते, व भाजपा नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते. आंदोलन कर्त्यांना पोलीस स्टेशनला आणुन डिटेन करुन सोडुन देण्यात आले
विस्कळीत झालेली राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहतुक जवळपास अर्ध्या तासाच्या मशागती नंतर पोलीस बळाच्या साहय्याने सुरळीत करण्यात आली. यावेळेस अांदोलन स्थळी छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.