Home विदर्भ कार-टेम्पोची धडक; चार जखमी, “तळेगाव येथील उड्डानपुलावरील घटना”

कार-टेम्पोची धडक; चार जखमी, “तळेगाव येथील उड्डानपुलावरील घटना”

366

इकबाल शेख 

वर्धा / तळेगांव (शा.पं.) : येथील नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कारवर विरुद्ध दिसेने येणारा मालवाहु टेम्पो समोरून आदळून झालेल्या अपघातामध्ये  कारमधुन प्रवास करणारे चार प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये एकरा वर्षाचा लहान मुलाचाही समावेश आहे.
नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील तळेगावातील उड्डान पुलावरुन नागपुर वरुन कारंजा लाड ला एम.एच ३१ सी.पी. ५३१२ क्रमांची कार आपल्या दिशेने जात असताना त्याच बाजुने विरुद्ध दिशेने येणार्‍या मालवाहु टेम्पो क्रं. एम.एच. २७ बी.एक्स ने धडक दिली यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन कारने प्रवास करणारे विजय रोटे वय ५० वर्ष, परम रोटे वय ११ वर्ष, रमा भांडे वय ६० वर्ष, छबु विरुळकर वय ५२ वर्ष सर्व राहणार नागपुर ही सर्व एकाच कुटुबातील असुन प्रवास करीत होते यामध्ये चारही किरकोळ जखमी झाले त्यांचेवर तळेगावतीलच खाजगी दवाखाण्यात उपचार करण्यात आला. या अपघातातील मालवाहु टेम्पो चालक घटनास्थळावरुन पसार झाला अपघाताची नोंद तळेगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.