
बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वित प्रहारचे आंदोलन
ईकबाल शेख
वर्धा – गेल्या काही दिवसांपासून प्रहार कडून आर्वी शहरातील भूमिगत गटार योजनेच्या अनियमित कामामुळे ये जा करणाऱ्यांची दमशाक होत आहे. पावसाळा चालू झालेला आहे. केव्हाही पाऊस येऊ शकतो त्यामुळे भूमिगत गटार योजनेच्या चालढकल कामामुळे व अपुऱ्या कामामुळे पावसाच्या पाण्याने रस्त्याचे खास्तहाल होत आहे.
थोडा जरी पाऊस जास्त आला तर पूर्ण रस्ते चिखलात माखलेले पाहायला मिळेल. आणि त्यामुळे वेळीच मार्ग न काढल्यास मोठ्या समस्येला आर्वी करांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे लवकरात लवकर सदर प्रश्न मार्गी लागावा ही आमची रस्त अपेक्षा आहे.
या समस्येला धरून वेळोवेळी निवेदने, आंदोलने करून देखील निष्क्रिय लोकप्रतिनिधी व सुस्त प्रशासन झोपेचे सोंग घेतलेले पाहायला मिळत आहे.
त्यामुळे या निद्रिस्त प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जागृत करण्यासाठी प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात चिखलातच उपोषणाला बसून अभिनव असे प्रतीकात्मक आंदोलन केले.
आंदोलनाच्या तब्बल दोन तासानंतर आर्वी मुख्याधिकारी विनायक मगर व संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन काळ्या मातीच्या जागी मुरूम टाकून रस्ता पूर्वरत करून देण्याचे आश्वासित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यानंतरही ही योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलनच स्वरूप हे वेगळे असेल असे बाळा जगताप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आंदोलनात सुधीर जाचक, अरसलान खान, जुम्मा शाह, विक्रम भगत, अंकुश गोटेफोड़े, गुड्डु पठान, विक्की पाटनकर, मंगेश सोरते, विशाल कैलाखे, विधधेश्वर नेवारे, संतोष गौरकार, शेख वाजिद आदि प्रहारचे कार्यकर्ता उपस्थित होते।










































