Home विदर्भ सर्वपक्षीय कोरोना निर्मूलन समिती द्वारे संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याबाबत निवेदन

सर्वपक्षीय कोरोना निर्मूलन समिती द्वारे संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याबाबत निवेदन

274

रविन्द्र साखरे आर्वी

आर्वी शहर व परिसरात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे व अत्यंत निकटवर्तिय नातेवाइक मृत्यमुखी पड़त आहेत.
भविष्यात शेकडो लोकांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑक्सीजन सिलेंडर,रेमिडीसीवेर इंजेक्शन व इतर अत्यंत गरज असलेल्या वस्तुची कमतरता आहे.
या सर्व परिस्तिथि नुसार कोरोना साख़ळी तोड़ने गरजेचे आहे व त्याशिवाय पर्यायच नाही.
वर्तमान स्थितिचा संपूर्ण विचार करून आर्वी शहरातील सर्व राजकीय पक्षाचे व काही सामाजिक संगठनेचे पदाधिकारी एकत्र आले.
सर्वानी कोरोना साखळी तोडण्या करीता कमीत कमी 7 दिवस आर्वी शहरातील अत्यावश्यक सेवेसह (आरोग्य सेवा वगळून) संपूर्ण बाजारपेठ बंद करण्या करीता व्यापारी संगठनेला विनंती करण्यावर सर्वांची भूमिका ठाम झाली.
त्याच प्रमाणे सर्वानी मिळून व्यापारी संगठन आर्वी यांना कमित कमी 7 दिवस अत्यावश्यक सेवा सहित( आरोग्य सेवा वगळून) इतर सम्पूर्ण बाजारपेठ बंद करण्यात यावी याबाबत निवेदन दिले व विनंती केली.
संबंधित निवेदन जिल्हाधिकारी,वर्धा मार्फत उपविभागीय अधिकारी ,आर्वी व पोलिस अधीक्षक मार्फत पोलिस निरीक्षक, आर्वी सुद्धा देण्यात आले.
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू, अंसार भाई, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अब्बू भाई, दिनेश लायचा, योगेश ताजनेकार, भारतीय राष्टीय कॉंग्रेसचे दीपक मोटवानी,युवा स्वाभिमान चे दिलीप पोटफोड़े,कमलेश चिन्धेकर, राष्ट्रवादी चे वृषभ निस्ताने,दर्पण टोकसे,संदेश ठाकरे, प्रहार चे सुधीर जाचक,अर्सलान खान,मनसे चे विजय वाघमारे,भाजी मंडी चे प्रफुल काळे, मनोज गोडबोले,अजीत गुजर व इतर पदाधिकारी उपस्तिथी होते.