
ईकबाल शेख
तळेगांव (शा.पं.) : – तळेगांव पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार कामठी नागपुर येथुन आर्वी मार्गे अमरावतीला अमानुशपणे गुरे कोंबुन घेवुन जाणारा ट्रक क्रं. MH 40- N- 7517 हा तळेगांव वरुन आर्वीकडे जात असताना सापळा रचुन वर्धमनेरी नजीकच्या निरकांर कोटेक्स जवळ पकडला. त्यामधील अारोपी शेख मेहमुद शेख मुस्ताक रा. कोळसा टाॅल कामठी व सय्यद फारुख सय्यद रशीद रा. भाजीमंडी कामठी यांना ताब्यात घेवुन गुरांची किंमत २लाख विस हजार व ट्रकची कि्मत १५ लाख असा एकुन १७ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून २२ गुरे हे बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने संत लहानुजी महाराज देवस्थान टाकरखेड येथील गोशाळेत पालन-पोषण करण्याकरिता नेण्यात आले तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय.पवन भांबुरकर, जमादार बावणे , पो.शि.रोशन करलुके राहुल ओमुने रुपेश उगेमुगे आशिष नेहारे हे करीत आहेे.










































