
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे १८फेब्रुवारी,गुरुवार रोजी जालना जिल्हा रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती.जिल्हा औषधी संघटनेच्या पदाधिका-यांचा कुंभारपिंपळगाव औषधी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला . बैठकीत जिल्हाध्यक्ष साईनाथ पवार यांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.शहर कार्यकारणी बाबत चर्चा करून कुंभार पिंपळगाव मेडिकल असोसिएशनच्या शहर कार्यकारिणी जालना जिल्हा अध्यक्ष साईनाथ पवार, उपाध्यक्ष सुनील शेळके ,सचिव- जितेंद्र, लखोटिया, जेष्ट मार्गदर्शक सतीश सारडा, घनसावंगीचे माजी अध्यक्ष धैर्यशिल देशमुख, धनंजय सराटे, उध्दव देशमुख यांच्या उपस्थितीत मेडिकल असोसिएशनची कार्यकारिणी घोषित करण्यात आली . अध्यक्ष पदी अशोक कंटुले ,तर उपाध्यक्ष पदी – दिनेश लाहोटी , सचिव – ऋषिकेश सोळंके, कोषाध्यक्ष सुनील मुंदडा यांची निवड करण्यात आली.

यावेळी केमिस्ट अशोक लाहोटी , अशोक कंटुले,अनिल मुंदडा, राहुल टेकाळे ,ऋषिकेश सोळंके, अतुल सोळंके ,संदिप पवार , योगेश काळे, योगेश माने, अतुल करपे, दिनेश लाहोटी , सुनील बजाज ,राजेंद्र शिकारे , वैभव कंटुले,अच्युत कंटुले ,पांडुरंग कंटुले यांची उपस्थिती होती. यावेळी औषधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ पवार यांनी अध्यक्ष , उपाध्यक्ष यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.











































