Home जळगाव जानोरी येथील गावठी हातभट्टीवर सावदा स.पो.नि. इंगोले यांची धाड…

जानोरी येथील गावठी हातभट्टीवर सावदा स.पो.नि. इंगोले यांची धाड…

519

रावेर (शरीफ शेख )

रावेर तालुक्यातील जानोरी गावाच्या शिवारात गावठी हातभट्टी वर सपोनि देविदास इंगोले यांनी धाड टाकली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा पोलिस ठाण्यात नाशिक हून नव्यानेच रुजू झालेले सपोनि देविदास इंगोले यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जानोरी गावाच्या शिवारातील भवानी नाल्यावरील गावठी हातभट्टी वर मोठ्या चतुराईने आपल्या पोलीस सहकाऱ्यांसोबत छापा टाकून एकूण 600 लीटर गावठी दारुचे कच्चे रसायन , सुमारे 13 हजार रुपये किंमतीचे मिळून आल्याने ते जागीच नष्ट करण्यात आले असून तया संबंधित गुन्हा दाखल करीत आहेत याविषयीची माहिती सपोनि देविदास इंगोले सावदा पोलिस स्टेशन तर्फे प्रसार माध्यमांना दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश शिंदे, मुक्ताईनगर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देविदास इंगोले यांनी पो,हे ,काॅ देवेंद्र पाटील, रिजवान तडवी, पी एस आय राजेंद्र पवार सह पोलीस अधिकारी मिळून मोठी कारवाई केली.यामुळे सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंदेवाले यांच्या मनात मोठी धडकी नक्कीच भरली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत . तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व परी प्रयत्न करण्याची धमक सपोनि देविदास इंगोले यांच्या कारवाई तून नागरिकांना अनुभवायला मिळाली, यामुळे महिला वर्गाकडून विशेष कौतुक केले जात आहे.