Home विदर्भ घरून निघून पणजी गोवा येथे गेलेल्या अल्पवयीन मुलींना अवघ्या काही तासात शोधले

घरून निघून पणजी गोवा येथे गेलेल्या अल्पवयीन मुलींना अवघ्या काही तासात शोधले

374

कारंजा पोलिसांची जबरदस्त कामगिरी

 

 

पोलीस निरीक्षक राजपुत यांची धडक कार्यवाही

रविन्द्र साखरे‌

वर्धा  / कारंजा – बेपत्ता असलेल्या मुली गोवा येथे मिळल्या दिनांक 23 जानेवारी रोजी कारंजा व गारपीट येथील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची तक्रार कारंजा पोलिसात देण्यात आली होती कारंजा पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची तात्काळ शोधमोहीम सुरू केली त्यांच्या कडे असलेल्या मोबाईल च्या कॉल डिटेल्स ने त्यांना शोधणे सुरू केले असता त्या पुणे येथून पालम ट्रॅव्हल्स ने गोवाच्या कडे निघाल्या असल्याचे दिसून आले दरम्यान पालम ट्रॅव्हल्स ला संपर्क करून ट्रॅव्हल्स च्या ड्राइव्हरशी संपर्क केला मात्र मुली ह्या पणजी येथे उतरल्याचे ड्राइवर ने पोलिसांना सांगितले नंतर गोवा पोलिसांनी शोध मोहीम सुरू ज्या ठिकाणी मुली उतरल्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले नंतर मुली एका टॅक्सी त बसल्याचे दिसून आले पोलिसांनी टॅक्सी नंबर वरून टॅक्सचालाकाला गाठले टॉक्सिचकाळाच्या सांगण्यावरून त्यांना एका हॉटेल येथे सोडल्याचे सांगितले गोवा पोलिसांनी हॉटेल गाठून त्या अल्पवयीन मुलींना आपल्या ताब्यात घेतले असून कारंजा पोलिसांचे पथक गोवा येथे रवाना झाले होते त्यांनी त्या दोनही मुलींना ताब्यात घेतले असून पोलीस कारांजाच्या दिशेने रवाना झाले आहे पोलिसांनी तत्परतेने हालचाली केल्याने मुलींना लवकर शोधण्यात मदत झाली ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी तत्परता दाखवत पोलीस पथक गोव्याकडे रवाना केले होते यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सचिन मानकर , यशवंत गोहत्रे, पूजा लोहकरे ,कापरे यांचे पथक पाठवण्यात आले व तब्बल 2600 किलोमीटर अंतरावरून आता त्यांना पोलिसांनी सुखरूप परत आणले आहे.