
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी येथील नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळ माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक ईश्वर ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,
मुली असा बराच मोठा आप्त परीवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शिवसेना संघटक तथा घाटंजी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकुर, जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी पप्पु पाटील भोयर, घाटंजी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ. विजय कडू, शिवसेना घाटंजी शहर अध्यक्ष मनोज ढगले, नगर परिषदेचे माजी सभापती प्रशांत उगले, मधुकर निस्ताने, राजु पाटील भोयर, स्वामीनीचे महेश पवार व घाटंजी तालुक्यातील व ईतर अनेक गनमान्य नागरीक अंत्यविधीला उपस्थित होते, हे विशेष.










































