Home विदर्भ भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्ह्य कडून महावितरण कार्यालय समोर विज बिल होळी...

भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्ह्य कडून महावितरण कार्यालय समोर विज बिल होळी आंदोलन

165

यवतमाळ – लॉकडाऊन च्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. लॉकडाउन मुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठ्या वीज बिलाचा शॉक दिला.

 

 

याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनीच वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकानांच वीज बिल भरावे लागतील, असे स्वतः स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीज बिल वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून, सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी विरोधीपक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला आहे.

महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी, या मागणीसाठी भाजपा यवतमाळ तर्फे सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर 20 रोजी सकाळी 11 वाजता वीज वितरण कंपनी कार्यालय समोर, बस स्टँड चौक यवतमाळ येथे भाजपा जिल्हा नेते आमदार श्री मदन भाऊ येरावार व जिल्हाध्यक्ष श्री नितीन भाऊ भुतडा यांच्या मार्गदर्शनात *श्री प्रशांत यादव पाटील शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री श्री राजूभाऊ पडगिलवार व जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण प्रजापती यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या आंदोलनात श्री राजेंद्र डांगे, विजय कोटेचा, जितेंद्र पाटील विरदंडे, बाळासाहेब शिंदे, मोहनभाऊ जाधव, शंतनु शेटे, मायाताई शेरे, आकाश धुरट, प्रा. अमोल देशमुख, अजय खोंड, हेमंत दायमा, अमोल ढोणे, अजय राऊत, अजय बिहाडे, सुनील समदूरकर, कीर्ती राऊत, नंदा जिरापुरे, वैशाली खोंड, स्मिता भोईटे, कविता बोरुळकर, अश्विन बोपचे, शुभम चोरमले, अश्विन तिवारी, सुरज विश्वकर्मा, यश चव्हाण, भाविन पतिरा, रमेश फुलकर, मिलिंद कासार दिनेश चिंडाले, जयदीप सानप, हिमांशू श्रीवास, राकेश मिश्रा, सचिन व्‍यास, सौरभ ब्राह्मणे, अनिकेत ब्राह्मणकर, अंकुश बगमारे, देवा राऊत, दिलीप पुरी, शंकर पनिया, भीमसेन केशवानी, रवी कडव, अभिलाश ठाकरे, उषा खटी, भारती जाठे, एम बी ननवरे, दीपक जाधव अमोल कदम, प्रशांत देशमुख, किशोर जोतवाणी, मोहन जाधव, सुनिता मडावी, करुणा तेलंग, मीनल पांडे, महेश धुळे, सुरेश उन्हाळे, सूरज जैन, देविदास अराठे, पंकज सोनिगता, संजय शिंदे पाटील, मुन्ना खान्देडिया, लता ठोंबरे, सुनील बावनकुळे, सुधीर भोईटे, हरीश पाटील, प्रमोद कुटे, अमन यादव, सोमेश चौधरी, भावेश गडिया, भारत ब्राह्मणकर व अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झालेत.