Home विदर्भ शेतकऱ्यांने केली विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

शेतकऱ्यांने केली विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

152

तळेगाव शामजी पंत – रविन्द्र साखरे

वर्धा –  आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोटोना गावच्या मौजा धानोरा शिवारात सुधीर पाटील यांच्या शेतात रवींद्र धनराज बागडे वय 45 राहणार बोटो ना यांचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगत असताना दिसला प्राप्त माहितीनुसार मृतक रवींद्र धनराज बागडे वय 45 हे बोटो ना येथील रहिवासी असून त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे शेतीच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशावर परिवाराची उपजीविका चालवीत होता सतत तीन वर्षापासून होणारी ना पैकी तसेच यावर्षी सुद्धा सोयाबीन ने मोठा दगा दिल्याने मोठे नुकसान झाले कपाशीचे सुद्धा रोगामुळे तसेच कपाशीचे बोंडे सडकी असल्याने कापूस अद्यापही घरी आला नाही हे लक्षात घेऊन रवींद्र नेहमी चिंतेत असल्याचे सांगितले या विवंचनेत राहून त्याने आज सकाळी पहाटे पाच वाजता सुमारास घरून निघाला व मौजा धानोरा शिवारात सुधीर पाटील यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली शेतमालक हे नेहमीप्रमाणे मजुरा करिता विहिरीवर पाणी आणण्याकरिता असता त्यांना शेतातील विहिरीत एक प्रेत तरंगत असताना दिसले त्यांनी गावातील पोलीस पाटील खुशाल मोहिते यांना माहिती दिली पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन मृतकांची ओळख पटविली व घटनेची तक्रार आष्टी पोलिस स्टेशनला दिली या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्यामागे दोन मुली आई वडील पत्नी असा मोठा परिवार आहे सदर घटनेचा तपास आष्टी पोलीस स्टेशन करीत आहे