Home महत्वाची बातमी अतिवृष्टिमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना पिक विम्यासहित नुकसान भरपाई द्या …. शिवसेनेची...

अतिवृष्टिमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना पिक विम्यासहित नुकसान भरपाई द्या …. शिवसेनेची मागणी

189

अतिवृष्टिमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना पिक विम्यासहित नुकसान भरपाई द्या …. शिवसेनेची मागणी .
रवि जाधव
देऊळगाव राजा:-आज २१ऑगस्ट शुक्रवारी पावसाच्या सततधार व् अतिवृष्टिमुळे शेतकरी वर्ग यांचे नुसकाणीचे तात्काळ सयुक्तिक पंचनामे करुन पीक विम्यासहीत नुकसान भरपाई द्या ही मागणी तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या कडे तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्याचे उडीद, मुग, कपाशी, व सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमानातं नुकसान झाले आहे .मुग आणि उडीद या पिकांना अक्षरशः कोम फुटलेले आहे ,मुग व् उडीद हातचे गेल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे .शेतकऱ्याना नुकसान भरपाई तातडीने मिळण्यासाठी पिक विमा प्रतिनिधि व कृषि विभागाचे प्रतिनिधि यांनी संयुक्त रित्या पंचनामे करावे व पिक नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच शासनाने प्रतिहेक्टरी २५००० रू पिक अनुदान द्यावे. अशी मागणी शिवसेनेच्यावतीने तालुका प्रमुख दादाराव खार्डे यांनी तहसीलदार देऊळगावराजा यांचेकड़े केली .यावेळी त्यांच्या सोबत, उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर ,डॉ रामप्रसाद शेळके ,धनशिराम शिपणे ,गिरीश वाघमारे ,गोविंदराव झोरे ,अविनाश डोइफोड़े राजीव नागरे, भगवान खंदारे, दीपक पवार,माऊली शेळके , अतीश खराट ,अभय दीडहाते, विलास शेळके ,अशोक कांबळे ,विकास गवई, नामदेव मगर,कृष्णा लहाने सह शिवसैनिक हजर होते.