
योगेश कांबळे
वर्धा – स्वातंत्रदिनाचे औचित्य साधत कोरोना प्रादुर्भाव काळात पालकमंत्री ना.सुनील केदार यांचा त्यांनी जिल्ह्यात केलेल्या भरीव कामगितीबद्दल भूमिपुत्र संघर्ष वाहिनी महाराष्ट्र च्या वतीने नागरी सत्कार शिववैभव मंगल कार्यालय, वर्धा येथे करण्यात आला. याप्रसंगी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित पाटील फाळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे राज्य संयोजक रितेश घोगरे, जिल्हा संघटक प्रवीण काटकर, जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर मुटे यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.
कोरोनाचा काळ हा सर्व मानवजातीसाठी परीक्षेचा काळ होता. या काळात सर्वसामान्य माणसांचे शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न कसे हाताळावे हे शासन व प्रशासनासमोर खूप मोठे आव्हान होते. पण अश्याही काळात जमिनीवर सातत्याने लोकांशी संपर्क ठेवत शेतकऱ्यांचा पिककर्जाचा प्रश्न, कापूस खरेदीचा प्रश्न, नाफेड खरेदी या बाबतीत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी जी आश्वासक भूमिका पार पाडली, ते अतिशय अभिमानास्पद आहे. म्हणून भूमिपुत्रांना हा त्यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. याप्रसंगी या सत्काराचा स्वीकार करत, सम्पूर्ण जग थांबले असताना केवळ शेतकरी आपले काम सातत्याने चालू ठेवून होता असे बोलत ना.सुनील केदार यांनी शेतकऱ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. सोबतच अभिजित पाटील फाळके यांच्या नेतृत्वात भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने कोरोना काळात वर्धा जिल्ह्यासाठी केलेल्या भरीव कामगिरीचे भरभरून कौतुक केले.
पालकमंत्री म्हणून ना.सुनील केदार यांनी एका पालकाची भूमिका वर्धा जिल्ह्यासाठी बजावली असून, त्यांच्या शासकीय व प्रशासकीय पातळीवरील कार्याने जिल्ह्यातील हजारो लोकांना दिलासा भेटला असल्याचे प्रतिपादन अभिजित पाटील फाळके यांनी केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना रितेश घोगरे यांनी केली. सूत्रसंचालन अर्चना पेठे तर आभारप्रदर्शन प्रवीण काटकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवीण पेठे, समीर राऊत, अभिजित कुत्तरमारे, पंकज इंगोले, विवेक लोहकरे, सागर सबाने, शुभम उगेमुगे, देवाश्रय अरगुडे, विशाल उराडे, तुषार येवतकर, सचिन देशमुख, प्रवीण उगेमुगे, अर्चित निगडे, स्वप्नील किटे, सतीश गवळी, नितीन भोयर यांनी परिश्रम घेतले.











































