Home नांदेड युवकाची गळफास घेऊन आत्महत्या , कुजलेल्या अवस्थेत दिसून आले मृतदेह

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या , कुजलेल्या अवस्थेत दिसून आले मृतदेह

164

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि ०६ :- मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील कनकी ता. किनवट येथील 28 वर्षीय युवकाचे अंबाडी घाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले.या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

काल दिनांक 5 जुलै रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास वनपरिमंडल अधिकारी अर्चना पांदेलवाड ह्या अंबाडी घाटात गस्तीवर असताना त्यांना एका युवकाचे प्रेत झाडाला लटकले ले दिसून आले.त्यांनी घटनेची माहिती मांडवी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटना स्थळी जाऊन कनकी ता.किनवट येथील युवक अविनाश उल्हास जाधव वय 28 वर्ष या मयताची ओळख पटविली. मोटारसायकल बाजूला ठेवून एका पळसाच्या झाडाला अविनाश ने गळफास घेतला.
मयता वर मांडवी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मांडवी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शिवाप्रसाद कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मडावी हे करीत आहे.