Home विदर्भ अकोला बाजार येथे पोलिसांनी केली ख-र्याची होळी

अकोला बाजार येथे पोलिसांनी केली ख-र्याची होळी

186

ठाणेदार रनधीर यांनी मागीतला नागरिकांना खर्रा

यापुढे खर्रा न खाण्याचा शौकीनांचा संकल्प

देवानंद जाधव

यवतमाळ / अकोला बाजार :- पोलीसांनी बाजारपेठेत फिरून नागरिकांजवळुन खर्रा मागुन गोळा केला .व त्या ख-र्याची बसस्टॉप चौकामध्ये लोकांसमोर जाळुन होळी करण्यात आली. व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खर्रा विक्री व खर्रा सेवन बंद करण्याबाबत पोलीसांकडुन जनजागृती करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र लाॅकडाउन पाळल्या जात आहे. यामध्ये पानठेले बंद ठेवण्यात आले आहे. पानठेल्यामुळे लोक विनाकारण एकत्र जमा होतात .खर्रा , पान , व तंबाखूजन्य पदार्थ खाणारे सतत थुंकत असतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते .हा प्रकार टाळण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात पानठेले उघडण्यास शासनाने प्रतिबंध घातला आहे .तरीही लपून छपून खर्रा विक्री सुरू आहे. यामुळे शासनाचे नियमाचा भंग तर होत आहे परंतु कोरोनाचा धोकाही वाढला आहे .

वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर यांनी अकोला बाजार येथील बाजारपेठेमधील दुकाने , बँका ,व रस्त्यावर आपल्या पोलीस कर्मचा-यासह फिरून नागरिकांना प्रेमाने खिशातील खर्रा मागीतला व खर्रा शौकीनांनी तो काढुनही दिला . गोळा करण्यात आलेल्या ख-र्याचे पुडके एकत्र करून येथील बसस्टॉप चौकात पोलीसांनी लोकासमक्ष होळी केली. खर्रा शौकीनांनी यापुढे खर्रा न खाण्याचा संकल्प केला.

खर्रा खाणे आरोग्यासाठी हानीकारक असुन याचा समाजावर विपरीत परिणाम होतो. खर्रा खाउन रस्त्यावर थुंकणा-यावर कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार नरेश रणधीर यांनी सांगितले .

यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष आरीफ बुधवाणी, हमीदखाॅपठाण , पोलीस पाटील राजेश काटपेलवार, मधुकर डाखोरे, प्रवीण मोगरे, हबीबखाॅ पठाण, गीरीष जगताप ,कुणाल कराळे, राजु मादेशवार, प्रभू बंडीवार, जमादार बालाजी ससाणे व पोलीस कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. पोलीसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले .