
रविवारी जोशी पेठ व मानियार वाडा मध्ये होणार तपासणी
रावेर (शरीफ शेख)
जळगाव कोविड केअर युनिट तर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिराचा नऊवा दिवस आज शनिवारी पाळधी येथील ग्रामीण भागातील ३५५५ लोकांची तपासणी थर्मल ऑक्सिमीटर व फींगर ऑक्सी मीटर ने करण्यात आली.
त्या पैकी ५४६ लोकांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औशोधोपचार करण्यात आला.
त्यापैकी फक्त दोन संशयास्पद रुग्ण आढळून आल्याने त्यांची रवानगी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात करण्यात आली.
उद्घाटन समारंभ
या वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन पाळधी येथील अन्वर शेख स्वामिल प्रोप्रायटर व जी.प .सदस्य प्रताप पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जे सी सी यु चे अध्यक्ष गफ्फार मलीक, समन्वयक डॉक्टर जावेद शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड ,सरपंच चंदू पाटील व प्रकाश पाटील, जमील देशपांडे, मुफ्ती अतिकुर रहेमान,फारूक शेख,अनवर सिकलगर,शाहिद सय्यद व अल्ताफ शेख यांची उपस्थिती होती.
रुग्णाची अशीही मदत
जळगाव रुग्णालयात उपचार घेत असलेले एस टी महामंडळाचे निवृत्त चालक व इकबाल कॉलोनी मेहरून चे राहिवासी रहेमतूल्लाह शेख आमिर यांनी आपली एक वर्षाची पेन्शन रु ११ हजार ही कोविड केअर युनिट ला औशोधोपचारा साठी रोख स्वरूपात पाठवली व जाहीर आव्हान केले की घाबरू नका,सामोरे या,आजार लपवु नका.
पाळधी कॅम्प मध्ये कार्यरत योद्धा डॉक्टर
डॉक्टर परवेज देशपांडे ,डॉक्टर वसीम कुरेशी, डॉक्टर अब्दुल वहाब, डॉक्टर कामील शेख, डॉक्टर मतीन शेख, डॉक्टर अल्ताफ खान, डॉक्टर शेख फिरोज अहमद ,डॉक्टर रइस कासार, डॉक्टर नसीम शेख, फिरोज ,डॉक्टर तौसिफ शेख, डॉक्टर वसीम शाह,डॉक्टर स्वप्नाली चौधरी, डॉक्टर सायमा खान, डॉक्टर आफ्रिन मुख्तार,डॉक्टर निषाद अब्दुल वहाब, डॉक्टर वसी अहमद, डॉक्टर अझीझुल्लाह शेख ,डॉक्टर नरेश पाटील, डॉक्टर अतुल नन्नवरे, डॉक्टर प्रदीप पवार ,डॉक्टर मोईज देशपांडे, डॉक्टर जावेद शेख, डॉक्टर जावेद अब्दुल सईद
शेख.
पाळधी येथील खंबीर कार्यकर्ते
सदर वैद्यकीय शिबिर यशस्वीतेसाठी अकील खान, सलीम हाजी, हाजी यासिन, मो अश्फाक,शौकत इब्राहिम, मोहम्मद मुस्ताक ,उमर बागवान, अशपाक पटेल ,साहिल पटेल, शहबाज देशपांडे ,शोएब शेख, शोएब देशपांडे, कयूम देशपांडे, यांनी सहकार्य केले
जळगाव येथील कार्य कर्ते
अतिक शेख ,अनिस शाह,अल्ताफ अल हिंद, अल्ताफ मनियार, आमिर शेख,अकील शेख ,फैझान शेख,अन्वर शिकलकर, अझीझ सिकलगर, अक्रम देशमुख,हाजी शेख युसूफ,मुश्ताक करिमी,मुजाहिद शेख,शाहिद शफी,अझहर हुसेन,हाफिज इब्राहिम यांनी नोंदणी,सर्वेक्षण व औषधी वाटप केले.
आयोजन व नियोजन संपूर्ण पणे सनवर शेख यांनी स्व खर्चाने केले होते
कार्यक्रमाची सुरुवात मुफ्ती अतिकूर रहेमान यांच्या कुराण पठणाने झाली.
स पो नि गायकवाड व गफ्फार मलिक यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक फारूक शेख यांनी सादर केले,सूत्र सनचलंन अल्ताफ शेख तर आभार जमील देशपांडे यांनी मानले.
रविवारी जोशी पेठ मध्ये गुलाब बागवान व सगीर बागवान यांच्या घरा जवळ दुपारी २ ते ५ वाजेच्या आत मेडिकल कॅम्प ठेवण्यात आले असून त्यात जोशी पेठ व मानियार वाड्यातील लोकांनी तपासणी करून घ्यावी असे आव्हान मुफ्ती अतिक, गफ्फार मलिक,डॉ जावेद,फारूक शेख,सगीर सेठ,गुलाब सेठ व सैयद चाँद यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.











































