July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

मनदेव जवळ खोदलेला डोंगर होणार कुण्या वाटसरुंची कबर?

देवानंद जाधव

नागपूर तुळजापुर या 361 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ ते आर्णी मार्गावरील मनदेव च्या तलावालगत, रस्ता निर्माण करण्या साठी, आकाशाला गवसणी घालणारा डोंगर खोदला आहे, माञ डोंगर खोदतांना तांञीक बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

डोंगर सरळ रेषेत खोदल्याने, वाटसरुंची जीवनरेखा अंधुक झाली आहे. आभाळाशी स्पर्धा करणार्या डोंगराला खोदल्याने,आणि शेकडो वेळा भूसुरंगाद्वारे स्फोट केल्याने अवघा डोंगर भुसभूशीत झाला आहे. पावसाळ्यात त्या डोंगरामध्ये पाणी मुरत असल्याने, दोन्ही बाजुला मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्ते निर्माण करणार्या दिलीप बिल्डकाॅन कंपनीने वाटसरुंची कबर खोदली असल्याची भावना वाहनधारकांची आहे. मागील कालखंडात पुण्याच्या “माळीन “गावात अवघे गाव ढिगार्याखाली गाडल्या गेल्याचा ईतिहास डोळ्यासमोर असतांना,सुध्दा मनदेव येथे डोंगर खोदतांना प्रचंड हलगर्जीपणा करुन जनतेचा जीव धोक्यात घातला जात आहे. भविष्यात डोंगरामध्ये पाणी मुरत जाईल, परिणामी डोंगर कोसळून अगणित मनुष्यहानी, वाहनांची आर्थिक हानी होईल, हे पहीलीच्या पोरालाही कळते, हा संभाव्य धोका सांगण्यासाठी कुण्या पारंगत पंडीताची गरज नाही. माञ दिलीप बिल्डकाॅन कंपनी आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या स्थापत्य अभियंत्यांना कळु नये, हे संयुक्तिक वाटत नाही. नागपूर वर्धा, भीडी,देवळी, यवतमाळ, आरणी, माहुर ऊमरखेड, नांदेड, तुळजापुर रस्ता निर्माण करतांना अनेक निरपराध वाहण धारकांचे रक्त सांडले आहे. बायकोच्या कपाळावरील “कुंकू “पुसुन आणि चिमण्या पाखरांना पोरकं करुन, परलोक प्रवासाला निघुन गेलेल्या नागरिकांची संख्या अगदी शेकडोच्या घरात आहे. शासन आणि प्रशासनाने या गंभीर बाबीचा गांभीर्याने विचार करुन वेळीच पाऊल ऊचलने गरजेचे आहे. अन्यथा काळाच्या पोटात काय दडलयं? हे ऊघड्या पुस्तकासारखे ऊघड ऊघड दिसते आहे.

तेव्हा प्राधिकरणाने मनदेव येथील डोंगरावर दृष्टिक्षेप टाकुन,योग्य ऊपाय योजना करावी आणि भविष्यातील मनुष्यहानी टाळावी अशी माफक अपेक्षा राष्ट्रीय महामार्गावर धावणार्य वाहन धारकांकडुन केली जात आहे. प्राधिकरणाने डोळ्यावर पाणी मारुन तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा “मनदेव “चे “माळीन “होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे माञ सुर्यप्रकाशाईतके सत्य आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!