Home जळगाव कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्री कृष्ण मंदिर संस्थान खिर्डी खुर्द या संस्थेचा निर्णय...

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्री कृष्ण मंदिर संस्थान खिर्डी खुर्द या संस्थेचा निर्णय ,घरीच देवपूजा,नामस्मरण करण्याचे आवाहन

352

खिर्डी खुर्द येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम रद्द…

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील खिर्डी येथील महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिर संस्थानात यंदा आषाढी एकादशी ची देवपूजा वंदन रद्द करण्यात आली आहे.महाराष्ट्रातुन येणारे व पंचक्रोशीतील भाविकानी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन खिर्डी खुर्द येथील श्री कृष्ण मंदिर संस्थान चे मठाधिपती आचार्य नरेंद्र महाराज यांनी आवाहन केले आहे .कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी आषाढी एकादशी ची देवपूजा वंदनाबाबत जळगाव जिल्ह्यातील सर्व संत, महंत महानुभावीय पंथीयांकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.दर वर्षी लाखो भाविक खिर्डी खुर्द येथील श्री कृष्ण मंदिर संस्थानात 800 वर्षांपूर्वी ची संगमरवरी पाषाणाची मूर्ती व महानुभाव पंथीयांचे चौथे अवतार श्री गोविंदप्रभु यांचा ‘आरशा’ विशेष या संस्थानात भाविकांना वंदन करण्यासाठी खुला करण्यात येतो परंतु या वर्षी कोरोना या महामारीमुळे या वर्षी आषाढी एकादशीची देवपूजा वंदन भाविकांसाठी बंद राहील.त्या अनुषंगाने खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थानात देवदर्शन कार्यक्रम बंद ठेवण्यात येत आहे.आषाढी एकादशी ला देवपूजा वंदन करन्यासाठी महाराष्ट्रातून तसेच पंचक्रोशीतून अनेक भाविक व उत्तर प्रदेशातील भक्तांची ही उपस्थिती प्रामुख्याने श्रीकृष्ण मंदिर संस्थानात असते. या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व तो रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व मठ, मंदिर,आश्रम,या संचालक,व्यवस्थापक,यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आषाढी एकादशीची देवपूजा, वंदन बंद ठेवण्यात आले आहे.त्यामुळे कोणीही आषाढी एकादशीची देवपूजा वंदन करण्यासाठी येऊ नये असे खिर्डी खुर्द येथील श्री कृष्ण मंदिर संस्थान च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

आचार्य श्री नरेंद्र महाराज महानुभाव
मठाधिपती श्रीकृष्ण मंदिर संस्थान खिर्डी खुर्द

कोरोना महामारी मुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आषाढी एकादशी निमित्त देवपूजा वंदन भाविकांसाठी खुली करण्यात येते परंतु कोरोनाचा प्रदूर्भाव व तो रोखण्यासाठी आम्ही देवपूजा वंदनाचा कार्यक्रम रद्द केला आहे . महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व पंचक्रोशीतील भाविकांनी देवपूजा वंदन करण्यासाठी येऊ नये असे आवाहन करत आहे.