Home महत्वाची बातमी अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान मदत म्हणून रोख रक्कम द्या , महाराष्ट्र नवनिर्माण...

अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान मदत म्हणून रोख रक्कम द्या , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेजालना जिल्हा प्रमुख गजानन गीते

170

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी
तालुक्यात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रोषणगाव मंडळात तर शेती सह इतर नुकसान झालेले असल्याने दुबार पेरणी लक्षात घेऊन तातडीने शेतकऱ्यांना मदत म्हणून रोख रक्कम देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेजालना जिल्हा प्रमुख गजानन गीते यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे केली आहे
जालना जिल्ह्यत गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस होऊन सहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकर्यांचे सरकी,सोयाबीन,मूग,मका,व इतर पिकांचे नुकसान झाले तर बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळातील रोषणगाव, अंबडगाव,कस्तुरवाडी,देवगाव,धोपटेश्वर,नानेगाव,बाजार वाहेगाव, माळेगाव, कुसळी आदी गावात शेती खरडून गेली तर काही शेतकऱ्यांचे जनावरे,व इतर साहित्याची हानी झालेली असल्याने या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे
बदनापूर तालुक्यातील सेलगाव व रोषणगाव मंडळातील 25 गावात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने या शेतकऱ्यांना तातडीने शासनाने मदत करण्याची आवश्यकता असून दुबार पेरणी करण्यासाठी बी-बियाणे,खते,औषधी खरेदी करण्यासाठी त्यांना रोख स्वरूपात मदतीची रक्कम देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना जिल्हा प्रमुख गजानन गीते,विष्णू शिंदे,कैलास खेंडके,रवी मदन,शिवाजी पवार,सूर्यकांत कलशेट्टी,बाळू जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत