July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

मुळे फाउंडेशनचे संचालक रमेश आण्णा मुळे यांना वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान पुरस्कार

लक्ष्मण बिलोरे

जालना / मराठवाडा – आर आर पाटील फाउंडेशनच्या वतीने कोरोना वीरांना दिला जाणारा वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान पुरस्कार औरंगाबाद येथील मुळे फाउंडेशनचे संचालक रमेश आण्णा मुळे यांना देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या अतिशय कठीण परिस्थितीत घराबाहेर पडून रमेश आण्णा मुळे यांनी पोलीस कर्मचारी, रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या परप्रांतीय लोकांना घरी सोडण्याची व्यवस्था केली. साधू, संत, महंत, मुल्ला मौलवी, फकिर यांसह सर्व धर्मातील लोकांना मदतीचा हात दिला औरंगाबाद, जालना, बुलढाणा या तीनही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना अन्नधान्य, किराणा किटचे वाटप केले. आपल्या जीवाची पर्वा नकरता रमेश आण्णा मुळे कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावर उतरून मदतीसाठी धावले पोलीस, आरोग्य कर्मचारी, यांना मास्क, सॅनिटायझर दिले. आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून रमेश आण्णा मुळे यांनी सामाजिक दायित्व प्राणपणाने जपले कोरोना महामारीच्या काळात रमेश आण्णा यांना बेताज बादशहा म्हणून संबोधू लागले अशा या वीर योद्ध्याला आर आर फाऊंडेशनने वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!