Home महाराष्ट्र कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका

कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका

185

आज संपुर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे सर्व जनता विचलित झाली आहे. आणि कोरोनाचे हे देशावरील महाराष्ट्रावरील संकट थोपविण्यासाठी डॉक्टर आणि जनता यामधला महत्वपूर्ण दुवा म्हणजे आरोग्य कर्मचारी (MPW) आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्याची भूमिका ही झाकोळली गेली होती पण या संकटाच्या काळात ग्राउंड लेवलवर ( ग्रामपातळीवर ) फिल्डमध्ये आरोग्य कर्मचारी हा जनतेत जाऊन कोरोनाविषयी कणखर भूमिका घेताना माध्यमांना दिसत आहे पण यापूर्वीही तो तितक्याच ताकदीने साथरोग डेंगू, मलेरिया, चिकन गुनिया, हत्तीरोग व अन्य साथरोगातसुद्धा कणखर भूमिका बजावत होता पण त्यावेळेस एका विशिष्ट भागात साथ असल्या कारणाने आरोग्य कर्मचारी झाकोळला होता आता वेळ आली आहे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याची त्यांच्या कार्याची दखल घेण्याची
या कोरोनाच्या संकट काळात आरोग्य कर्मचारी आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे घरी त्याला सोशल डिस्टन्स पद्धतीचा अवलंब करावा लागतो अशा खूप समस्यांचा सामना करत असताना त्यांच्या कुटुंबाला गरज आहे ती जुन्या पेन्शनची सर्वच शासकीय कर्मचारी आज कोरोनाच्या काळात खूप मोठी लढाई लढत आहेत पण दुर्दैवाने शासकीय कर्मचाऱ्याचे बरे वाईट झाल्यास कुटुंब उघड्यावर येऊ शकतात.
2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या आरोग्य कर्मचारी असो वा कोणताही शासकीय कर्मचारी कर्मचारी असो त्याला नितांत गरज आहे ती जुन्या पेन्शनची व त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता व प्रोत्साहनपर भत्ता देऊन सन्मान करण्याची गरज आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची भरपूर पदे रिक्त आहेत व ज्या ठिकाणी क्षेत्र कर्मचारी हत्तीरोग विभागात काम करतात ते ज्या ज्या वेळी आरोग्य विभागावर संकट येते त्या वेळी मोठ्या ताकदीने सहकार्य करतात क्षेत्र कार्यकर्त्यांचा उल्लेख या ठिकाणी करावाच लागेल अगदी कमी पगारावर तसेच संरक्षणात्मक साहित्य नसताना सुद्धा आघाडीवर राहून सहकार्य करणारा क्षेत्र कर्मचारी हा आरोग्य विभागाचा महत्वाचा घटक आहे. ज्या ज्या वेळी आरोग्य विभागावर संकट येते त्या त्या वेळी क्षेत्र कर्मचारी हा संकटमोचकाची भूमिका भूमिका बजावतो व आरोग्य कर्मचऱ्याची उणीव भासू देत नाही आज गरज आहे ती या क्षेत्र कर्मचाऱ्यांना 10% कोठ्यामधून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर तात्काळ पदोन्नती देऊन न्याय देण्याची 2017-2018 या भरतीत उच्चशिक्षीत क्षेत्र कर्मचाऱ्यांची पदभरती झाली होती आज त्यांना 2 ते 2.5 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी 3 वर्षाची अट शिथिल करण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये 10% कोठ्याची पदोन्नती वर्षानुवर्षे रखडली आहे व हे सर्व क्षेत्र कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका अतिउत्कृष्टरित्या बजावत आहेत.
सद्या आरोग्य कर्मचारी ( गट – क ) 10% कोठ्यातील पद्दोन्नतीच्या राज्यस्तर आणी जिल्हास्तरावर 1200 जागा रिक्त असून पद्दोन्नतीसाठी उच्च शिक्षित क्षेत्र कर्मचारी पददोन्नतीच्या प्रतीक्षेत आहे. क्षेत्र कर्मचाऱ्याने स्वतःच्या कामासोबत आरोग्य कर्मचाऱ्याचे काम देखील चांगल्या प्रकारे पूर्ण करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
मा.आरोग्य मंत्री महोदय साहेबांनी नुकतेच जाहीर केले आहे आरोग्य कर्मचाऱ्याचे एकही पद रिक्त ठेवणार नाही म्हूणन या वरील सर्व बाबींचा आधार घेऊन जर शासनाने आरोग्य कर्मचारी 10% कोठ्यातील पद्दोन्नतीच्या रिक्त जागा कार्यरत उच्चशिक्षित क्षेत्र कर्मचाऱ्यांमधून भरल्या तर नक्कीच हे सर्व उच्चशिक्षित क्षेत्र कर्मचारी आपल्या अनुभवाच्या व गुणवत्तेच्या जोरावर कोरोनासारख्या रोगावर विजय मिळवण्यासाठी स्वतःचा जीव प्राणपणाला लावतील यात तिळमात्र शंका नाही.
आरोग्य कर्मचारी हा या कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर नर्स यांच्यासोबत मोलाची भूमिका बजावत आहेत डॉक्टर आणि नर्सेस यांची जबाबदारी कोरोनाच्या काळात खूप वाढली आहे व ते या भूमिकेतला न्याय देत आहेत किंबहुना सर्वच आरोग्य विभागातील शासकीय कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणात जास्तीचे काम करूनसुद्धा थकत नाहीत कारण हे देशावरील संकट थोपविण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे हे सर्वांना माहीत असल्यामुळे ते खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत आरोग्य कर्मचारी हा थेट जनतेशी संपर्कात असतो ग्राउंड लेवलवर जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारा आरोग्य कर्मचारी व त्यांची भूमिका गावातील लोकांना भावली आहे असेच चांगले कार्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरू ठेवून या कोरोनावर नक्की विजय मिळवू शकतो हा संदेश जनतेत दिला आहे व तसे कार्यसुद्धा चालू आहे लवकरात लवकर कोरोनावर विजय मिळविणे आवश्यक आहे याची जाणीव सर्वांनाच आहे व त्यात आरोग्य कर्मचारी यशस्वी ठरत आहेत.

लेखन

विनय शेलुरे / राहुल आटोळे