Home विदर्भ कोरोना महामारीत नगर पालीकेत लाखोचा भ्रष्टाचार

कोरोना महामारीत नगर पालीकेत लाखोचा भ्रष्टाचार

250

पंधरा दिवसात चौकशी करण्याची नगरसेवक साकीब शाहाची मागणी…!

यवतमाळ / पूसद – नगर पालीकेने कोरोनाचे महामारीत अव्वाच्या सव्वा भावाने साहित्य खरेदी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नगरपालिका पुसदचे सत्ताधारी नगरसेवक साकीब शाहा यांनी केला आहे.

नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ट्रिपल लेअरचे मास्क, टु लेअर मास्क, सर्जिकल मास्क, हैंडग्लोज, अॅपरोन, पि.पि.ई.किट, लायझॉल आदी साहित्य कोरोना पासून नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरिता अव्वाच्या सव्वा भावाने खरेदी करून तसेच निव्वळ कागदोपत्री साहित्य खरेदी केल्याचा देखावा दाखविण्यात आल्याचा आरोप सुद्धा नगरसेवक साकीब शहा यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे.
वास्तविक पाहता नगर पालीकेने एकही कर्मचाऱ्यांला मास्क व पि.पि.ई किट वाटपच केल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार नगर सेवकाने प्रकाश झोतामध्ये आणला आहे.
नगर परिषदेने सॅनिटायझरसाठी 500 रुपये प्रति लिटर प्रमाणे शंभर नग खरेदी केले आहे. फेस शिल्ड साठी 200 रुपये प्रति नग प्रमाणे 4 हजार, इन्फ्रारेड थर्मामिटरसाठी 64 हजार 800 रुपये, पुल्स ऑक्सीमिटर साठी 20 हजार 700 रुपये, सोडीयम हायक्लोराईड प्रती नग 55 रुपये प्रमाणे 1.495 टन व बैटरी व हैन्ड स्प्रेयर 16 लिटर क्षमता असलेले 4 हजार 250 प्रति नग प्रमाणे 85 हजार रुपये खर्च केल्याचेही कागदोपत्री दाखविले असुन एकही साहित्य खरेदी केलेच नसल्याचा गंभीर आरोप नगर सेवक साकीब शाहा यांनी केला आहे.
त्याच प्रमाणे नगर परिषदेने कोरोना च्या काळात भाजीपाला विक्रीसाठी एकाच छताखाली मंडप टाकणे तसेच बैरीकेट टाकणे करीताही मोठ्या रक्कमेचा भ्रष्टाचार करीत असल्याचे सांगितले.
मंडपासाठी 8 लाख 83 हजार 350रु. तसेच बैरीकेटस साठी 4 लाख 41 हजार 486 रुपये अदा करणार आहे. प्रत्यक्षात मंडपाची जी क्वालिटी होती, ती अत्यंत निकूष्ट दर्जाची होती. आणि जेवढ्या दिवसासाठी व ज्या क्षेत्रफळाचे वर्णन देण्यात आले तेवढया क्षेत्रफळाचा मंडप ही टाकण्यात आला नाही. त्या संबंधीचे छायाचित्र जिल्हाधिकारीला आवलोकनासाठी तक्रारी सोबत जोडले आहे.

तसेच बॅरिकेट सुद्धा बांबूचे लावण्यात आले असून छोट्या प्रमाणात लावलेल्या बॅरिकेट्सचे मोठ्या प्रमाणात बिल टाकण्यात आल्याची माहिती सुद्धा नगरसेवक साकिब शहा यांनी यावेळी दिली. बैरीकेटींग व मंडप व्यवस्था देणाऱ्या पाकीजा मंडपचे कंत्राटदार सै.वकार हे नगर पालीकेचे कर्मचारी सैय्यद जमशेद यांचा मुलगा आहे. यामुळे याची ही चौकशी व्हावी अशी मागणी नगरसेवक साकिब शहा यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.