Home विदर्भ पोपटखेड धरणात 8 वर्षीय चिमुकलीचा करून अंत….. सुरक्षा रक्षक सह सुरक्षा भिंत...

पोपटखेड धरणात 8 वर्षीय चिमुकलीचा करून अंत….. सुरक्षा रक्षक सह सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी…..

133

देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणात मगंळवारी ८ वर्षीय बालीका पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना रुधाडी येथे घडल्याने संपुर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.अजंली ही पोपटखेड येथील दुर्गाप्रसाद कासदेकर यांची मुलगी असुन रूधाडी येथे मामाच्या घरी गेली होती.आज सकाळी ११ च्या सुमारास मामे बहिणी सोबत कपडे धूण्याकरीता धरणावर गेली असता पाण्यात पाय घसरल्याने ती बुडाली. तिला वाचवण्यासाठी मामे बहीणीनी पाण्यात ऊड्या घेवुन अजंलीला वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु अजंलीचे प्राण वाचवु शकल्या नाहीत.सुदैवाने दोघी बहिणीचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे.अशा घटनेमुळे पोपटखेड धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असुन येथे सुरक्षा रक्षक सह सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी पोपटखेड येथिल सामाजिक कार्यकर्ते व पचायंत समितीचे माजी सभापती पाडुरंग तायडे यांनी केली आहे.