Home विदर्भ पोलीस आयुक्‍त व मनपा आयुक्‍त यांनी केली फ्रेजरपुरा परिसराची पाहणी

पोलीस आयुक्‍त व मनपा आयुक्‍त यांनी केली फ्रेजरपुरा परिसराची पाहणी

694

मनिष गुडधे

अमरावती – फ्रेजरपुरा परिसरामध्ये रुग्ण आढळून येत आहे. त्या दृष्टीने पोलीस आयुक्‍त संजय बाविस्‍कर व मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी फ्रेजरपुरा परिसराची पाहणी केली.

पोलीस आयुक्‍त यांनी सदर परिसर संपुर्ण बॅरीकेटींग करण्‍याचे निर्देश दिले. या परिसरात मोठ्या प्रमाणात गस्‍त घालण्‍यात येत आहे. हा संपुर्ण परिसर निरीक्षण करण्‍यात येणार असून जो नागरीक नियमाचे किंवा दिलेल्‍या सुचनाचे पालन करणार नाही त्‍यांच्‍यावर कार्यवाही करण्‍यात येणार आहे. त्‍यांनी नागरीकांना सुचित केले की, हा आजार कोणाला सांगून येत नाही त्‍यामुळे स्‍वतःची काळजी स्‍वतःच घेणे आवश्‍यक आहे. घराच्‍या बाहेर कोणीही निघु नये. प्रशासनाला सहकार्य करुन दिलेल्‍या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. ज्‍या ठिकाणी रुग्‍न आढळलेला आहे त्‍या भागातील पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी व स्‍थानिक लोकप्रतिनिधी यांनी तेथील नागरिकांना आवश्‍यक असणा-या जिवनावश्‍यक वस्‍तुचा पुरवठा करण्‍यासाठी सहकार्य करावे असे त्‍यांनी यावेळी सुचित केले. प्रत्‍येकाने आपले काम आहे या भावनेने काम करावे. शासनमान्‍य औषधी वितरण करण्‍याचे निर्देशही यावेळी त्‍यांनी दिले. स्‍थानिक डॉक्‍टरकडून त्‍यांनी सदर रुंग्‍णाची माहिती जाणून घेतली व त्‍यांना दिशानिर्देश देण्‍यात आले.
फ्रेजरपुरा परिसरातील रुग्णांची संख्या वाढत आहे. दाट वस्‍ती असून बरेच कामगार वर्ग फ्रेजरपुरा परिसरातील रहिवासी आहेत. सुरुवातीला, पहिला रुग्ण आढळल्या बरोबरच कंटेंटमेंट झोन मध्‍ये समाविष्‍ट करुन ताबडतोब सील करण्यात आला तरीही रुग्णांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या कंटेंटमेंट झोनचे सर्वेक्षण केले गेले आहे. त्याअंतर्गत पोलीस आयुक्‍त व मनपा आयुक्‍त यांनी फ्रेजरपुरा परिसराला भेट दिली. नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देत सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला. परिसरातील नागरीकांनी सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करावे व जे नागरीक प्रशासनाने दिलेल्‍या सुचनांचे पालन करत नसेल त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कार्यवाही प्रस्‍तावित करण्‍याचे निर्देश यावेळी देण्‍यात आले.
पोलीस आयुक्‍त, मनपा आयुक्‍त यांनी गटनेता चेतन पवार, भोजा रायलीवाले, पोलीस अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी यांच्‍याशी या परिसरातील सद्याची स्थिती व पुढील उपाययोजना याबाबत सविस्‍तर चर्चा केली.
या पाहणी दौ-यात पोलीस विभागाचे अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.