Home नांदेड दिलासादायक” नांदेड येथुन आज पुन्हा ४ जणांना सुट्टी, तर दिवसभरात एका रुग्णांची...

दिलासादायक” नांदेड येथुन आज पुन्हा ४ जणांना सुट्टी, तर दिवसभरात एका रुग्णांची भर

171

नांदेड, दि ३० ( राजेश एन भांगे ) – जिल्ह्यातील शनिवार दिनांक 30 मे 2019 रोजी प्राप्त झालेल्या 131 हवाला पैकी 112 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. नवीन एक रुग्ण पॉझिटिव आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 144 झाली आहे.
आज दिनांक 30 मे 2005 रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर कोविड केअर सेंटर येथील 1 रुग्ण व उपजिल्हा रुग्णालय मुखेड यातील 2 रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील असे एकूण चार रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे, आत्तापर्यंत 144 रुग्णांपैकी 103 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. व 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे, तर 2 पॉझिटिव्ह रुग्ण फरार असून उर्वरित 33 रुग्णांवर औषध उपचार चालू आहे. त्यातील 2 स्त्री रुग्ण आहेत. त्यांची वय वर्ष 52 व 55 असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
आज प्राप्त झालेला 1 पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष (वय वर्ष 32) हा नांदेड शहराच्या इतवारा भागातील असून त्याच्यावर एनआरआय covid-19 सेंटर येथे उपचार सुरू आहेत.
व तसेच शुक्रवार दिनांक 29 मे 2020 रोजी पाठविण्यात आलेल्या 78 स्वॉब तपासणी अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील व शनिवार दिनांक 30 मे 2020 रोजी आणखी 74 स्वॉब अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत.. त्यांचे अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त होतील नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात अजुन एका पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ दिवसभरात 4 रुग्णांना सुट्टी.

☑️ एकूण रुग्ण संख्या 144 वर.

☑️ आत्तापर्यंत 103 बरे होऊन घरी.

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️8 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️33 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️2 संदर्भीत रुग्णांवर मुंबई येथे उपचार सुरू.

☑️ 2 महिला रुग्णांची प्रकृती चिंताजनक.

दरम्यान जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सदर माहिती दि. ३० मे. रोजी सायं ५ वा. प्राप्त नुसार.