July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

अखेर बदनापूर येथे ही पहोचला करोना  दोन रुग्ण सापडले ,

सर्वत्र उडाली खळबळ ,

सय्यद नजाकत ,

बदनापूर, (प्रतिनिधी)

कोरोना महामारी सुरु होऊन तीन महिने उलटले असतांना प्रशासनाने योग्य नियोजन राखल्याने कोरोना मुक्त म्हणून ओळखला जाणाऱ्या बदनापूर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला असून गुरुवारची सकाळ बदनापूर शहरातील नागरिकांना धक्कादायक ठरली असून बदनापूर शहरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने नगर पंचायत प्रशासनाने बदनापूर शहरातील काही भाग सिल केले असून गावात खळबळ उडाली आहे.
औरंगाबादसारख्या रेड झोनच्या शेजारी असल्यामुळे सुरुवातीपासूनच बदनापूरला कोरोनाचा सर्वाधिक धोका होता. अशा परिस्थितीतही पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग व नगर पंचायत प्रशासनाने केलेल्या काटेकोरपणामुळे बदनापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नव्हता. या परिस्थितीत बदनापूर येथे काटेकोरपणे खबरदारी घेण्यात येत असतानाच गुरुवारची पहाट बदनापूरवासियांसाठी धोक्याची ठरली. सुरुवातीला बदनापूर येथील मुख्य बाजारपेठेतील एक व्यापारी औरंगाबाद येथे आजारी असल्यामुळे उपचार घेत होता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची बातमी थांबते न थांबते तोच बदनापूर येथील जालना – औरंगाबाद हायवेवरील एक व्यापाऱ्याचा अहवालही जालना येथून पॉझिटिव्ह आल्याची बातमी येऊन धडकल्यामुळे बदनापूरवासियांसह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
गुरुवारी अचानक दोन पोझिटिव्ह केसेस निघाल्यामुळे बदनापूर शहरासह तालुक्यात सावधगिरी बाळगण्यात येत असून पोलिस प्रशासन, नगर पंचायत व आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेऊन दोन्ही रुग्ण रहात असलेल्या गल्याां व परिसर सिल करण्यात आला आहे. बॅरिकटस टाकून सॅनिटायझर फवारणी नगर पंचायतच्या वतीने सुरू केली असून आरोग्य विभागाच्या वतीने, त्यांचे क्लोज कॉन्टॅक्ट शोधणे सुरू करण्यात आले आहे. बदनापुरात कोरोनाने प्रवेश केला असून नागरिकांनी सुरक्षीत राहण्यासाठी खबरदारी घेण्याची खरी गरज असून नगर पंचायतच्या वतीने मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे,अभियंता गणेश ठुबे,रशीद मौलाना,अशोक बोकन व इतर कर्मचारी शहरात सर्वत्र स्वतः फिरून सिनेटझरची फवारणी करून घेत आहे तर पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम,बह्मणवत चरणसिंग व इतर कर्मचारी सील केलेल्या भागावर नजर ठेऊन आहेत,सापडलेले दोन्ही कोरोना बाधित औरंगाबाद शहरात काही नागरिकांच्या संपर्कात आल्याचे समजते
=============
डॉ.पल्लवी अंभोरे -मुख्य अधिकारी नगर पंचायत बदनापूर
बदनापूर तालुका व शहर हे काल पर्यंत कोरोनामुक्त होते परंतु गुरुवारी सकाळी धक्कादायक माहिती समोर आली असून दोन व्यापारी कोरोना बाधित आढळून आल्याने शहरातील काही भाग सील करण्यात आला असून नगर पंचायत च्या वतीने शहरातील सर्व भागात औषध फवारणी करण्यात आली असून नागरिकांनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे ,मास्क व सिनेतायझरचा वापर करावा ,विनाकारण कोणीही घराबाहेर निघू नये
================
एम.बी.खेडकर -पोलीस निरीक्षक बदनापूर
औरंगाबाद च्या सीमेवर बदनापूर शहर असल्याने या शहराला कोरोना चा धोका होता परंतु मागील अडीच महिने नागरिकांनी विशेष दक्षता घेतली असली तरी कोरोना चा शिरकाव शहरात झालेला असल्याने नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असून पोलीस प्रशासन,नगर पंचायत व आरोग्य विभाग आपापल्या पद्धतीने कोरोनाशी लढा देण्यासाठी तत्पर असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!