Home विदर्भ आभाळ माया…!

आभाळ माया…!

161

देवानंद जाधव

यवतमाळ – गुळगुळीत डांबरी रस्त्यावर हरभरे भाजुन निघावित अशी आग सुर्य ओकतो आहे. अशातच भूमिपुत्रां च्या घरादारांवर दुध , दही , ताक , लोणी , तुप, अशा पंच पदार्थांचा अभिषेक घालणार्या मुक्या जीवांची तगमग मानवी मन घायाळ करणारी आहे. दरवर्षी या महिन्यात लेकीबाळींची

“” रसाळी “” जोमात असायची, माञ यंदा यवतमाळ तालुक्यातील बहुतांश आंब्याच्या झाडाला कुणाची दृष्ट लागली देव जाणे. परिसरातील ” सयद्या” ” शेवळी, खोबर्या, लाडू, साखर्या, अशा नानाविध शब्द अलंकारांनी नटलेले असंख्य आंब्याची झाडं यंदा फळली नाहीत. या नामांकित आंब्याच्या रसासाठी आसुसलेली जीभ तोंडाला पाणी सोडते आहे. यंदा अस्सल गावरान आंब्याची चव परिसरातील जनतेला चाखता येणारच नाही, हे जरी खरे असले तरी……
तमाम आंब्याच्या झाडांनी आपला परोपकारी धर्म सोडला नाही. रानावनात आभाळाच्या छताखाली, धरणीची वाकळ करून ऊन, वारा, वादळ, आदी संकट ऊशाला घेऊन,झोपणार्या मुक्या जीवांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत मायेची ममता, प्रेम,आणि प्रेरणा देणार्या, आणि हिरव्या लुगड्याचा पदर तमाम मुक्या जीवांवर पसरविणार्या, सबंध झाडां बद्दल, काळजाच्या तिजोरीतील प्रितीचा सारा जिव्हाळा ओतून, प्रेम करणार्या, यवतमाळ तालुक्यातील हिवरी वन परिक्षेञ अधिकारी प्रशांत बहादुरे यांनी, आपल्या दृष्टीमधील सृष्टी चा परिचय करून देत, झाडांचे महत्त्व सांगणारे, आणि आभाळागत माया दाखवणारे ,अप्रतिम छायाचित्र आपल्या माध्यमांसाठी पाठवले आहे. तेव्हा झाडे लावा झाडे जगवा ,हा लाख मोलाचा संदेश आपण पंचक्रोशीत पेरूया.