Home जळगाव निर्मल सीड्स ने ५०० कुटुंबांसाठी “आर्सेनिक अल्बम ३०” या होमिओपॅथी औषधीचे केले...

निर्मल सीड्स ने ५०० कुटुंबांसाठी “आर्सेनिक अल्बम ३०” या होमिओपॅथी औषधीचे केले वाटप

134

निखिल मोर

पाचोरा – जगभर थैमान घातलेल्या covid-१९ कोरोना विषाणूच्या युद्धात आपण सर्व सहभागी होऊन सामूहिकपणे लढा देत आहोत. कोरोना विषाणूला हरविणे हे आपले अंतिम लक्ष असून त्यादृष्टीने आपले सर्वस्वी प्रयत्न सुरू आहेत. निर्मल सिड्स चा प्रत्येक कर्मचारी हा निर्मल परिवारातील घटक असून निर्मल सीड्स सदैव कर्मचार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. म्हणूनच कोरोनाच्या या गंभीर काळात कंपनीने यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सॅनीटायझर्स आणि मास्कचे वितरण केले आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा धोका लक्षात घेऊन निर्मल सिड्सने सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाची काळजी म्हणून सुमारे ५०० कुटुंबांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधीचे वितरण करून कार्पोरेट क्षेत्रात सामाजिकतेचा आदर्श घालून दिला आहे.

या वैश्विक संकटाला तोंड देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच निर्मल सिड्सने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी १५लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १८ लाखाची भरभरून मदत केली आहे. त्याचबरोबर पाचोरा व भडगाव शहरातील आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, प्रशासकिय यंत्रणा तसेच पाचोरा शहरातील सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्व पत्रकार बांधवांना तसेच पाचोरा बसस्थानकातील सर्व वाहक व चालक बांधवांना मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर्स आणि मास्क चे वितरण केले आहे. त्याचबरोबर पाचोरा शहरात तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पोलीस स्टेशन, रुग्णालय यातील सर्व कर्मचा-यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून पाच निर्जंतुकीकरण कक्ष चे ही वितरण केले आहे.