Home सातारा लवकरच टेंभूचे पाणी मायणी च्या तलावात येण्याचा मार्ग मोकळा – मा.आ.दिलीपराव येळगावकर

लवकरच टेंभूचे पाणी मायणी च्या तलावात येण्याचा मार्ग मोकळा – मा.आ.दिलीपराव येळगावकर

284

काम सुरू करण्यासाठी भिकवडी गावचे सरपंच, पोलीस पाटील तसेच भिकवडीचे कुलकर्णी कुटूंबाचे मोलाचे सहकार्य लाभले

मायणी ता.खटाव जि.सातारा – (सतीश डोंगरे) अनेक दिवस टेंभू योजनेचे काम रखडले होते परंतु माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या प्रयत्नातून मायणी तलावात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्यंतरी काम सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे काम थांबले व त्यानंतर जगभरात कोरोना सारख्या महामारी थैमान घातले यामुळे अक्क जग च लॉक डाऊन झाला त्याचा प्रादुर्भाव भारतातही मोठ्या प्रमाणात सुरू झाला त्यामुळे सगळे काम ठप्प झाले गेले दीड महिना पूर्ण देश टप्पा आहे त्यामुळे कोणत्या प्रकारची कामे सुरु नाहीत परंतु आता पावसाळा तोंडावर आल्यामुळे कामे पूर्ण करणे गरजेचे आहे टेंभू कॅनल पासून मायणी च्या तलावापर्यंत पाण्याचा मार्ग मोकळा झाला असून फक्त शंभर मीटर काम बाकी राहिले आहे या लॉक डाऊन च्या काळात काम पूर्ण करण्यासाठी मान खटाव च्या प्रांताधिकारी जिरंगे मॅडम व खटावच्या तहसीलदार डॉ पाटील मॅडम यांच्यासह खानापूरच्या तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्या संमतीने काम करण्याची परवानगी मिळाल्याची माहिती माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी दिली ८ ते १० दिवसात हे काम पूर्ण होईल .खटाव माण हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग परंतु अलीकडच्या काही काळत माण व खटवच्या काही भागात उरमोडी चे पाणी आले आहे .परंतु खटवच्या मायणी व परिसरात कोणत्याच योजनेचे पाणी पोहोचू शकले नाही .
आणि म्हणूनच डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या अखंड प्रयत्ननातून टेंभू योजनेचे पाणी मायणीच्या तलावात येण्याचा मार्ग मोकळा झाला आणि काम ही सुरू झाले परंतु गेल्या वर्षी दीपावलीच्या आगोदर तुफान पाऊस झाला त्यामुळे सर्व कामे बंद झाली त्यानंतर कोरोनामुळे काम करता येईना परंतु गप्प बसतील ते डॉक्टर कसले त्यांना माहिती होते की पुन्हा पावसाळा आला की काम सुरू करता येणार नाही . म्हणून त्यांनी प्रशासनाकडून जेवढ्या परवानग्या लागतात त्या पूर्ण करून काम सुरू करण्याची ऑर्डर मिळवली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 8 ते 10 दिवसात हे काम पूर्ण होईल.त्यामुळे या भागातील नागरिक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.