Home मराठवाडा नांदेड मध्ये एकाच दिवसात कोरोणाचे दोन बळी, पिरबुर्‍हाणनगर नंतर त्या सेलू येथील...

नांदेड मध्ये एकाच दिवसात कोरोणाचे दोन बळी, पिरबुर्‍हाणनगर नंतर त्या सेलू येथील महिलेचा पण मृत्यू

456

नांदेड, दि. ०१ ( राजेश भांगे ) – सेलू येथून उपचारासाठी नांदेड येथे दाखल केलेल्या त्या कोराना बाधित महिलेचा (वय.६० वर्षे) गुरुवारी दि. ३० एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
नांदेड येथे पहिला कोराना पॉझिटीव्ह होऊन निगेटीव्ह झालेल्या ६४ वर्षीय इसमाचा सुद्धा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. नांदेड मध्ये तीन रुग्णां पैकी दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्ह्यात एक महिन्याच्या काळात एकही रुग्ण न आढळून आल्याने जिल्हा ग्रीन झोन मध्ये गेला होता. परंतु त्या नंतर च्या दोन दिवसा नंतर म्हणजे, दि. २२ एप्रिल रोजी पीरबुर्‍हाण नगर येथे राहणार्‍या एका ६४ वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णास वेगवेगळे आजार ही होती. मात्र तीन दिवसांपूर्वी या रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या इसमाच्या मृत्यूच्या काही तासां नंतरच रात्री सव्वा दहाच्या वाजेच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका साठ वर्षी महिलेचा सुद्धा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. मृत झालेली महिला नांदेड येथे उपचारास येण्यापूर्वी तिच्यावर औरंगाबाद येथे ही उपचार झाल्याचे सांगण्यात येते. मात्र सेलू येथील डॉक्टरांनी त्या महिलेस नांदेड येथे रेफर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्या महिलेस तिचे दोन नातेवाईक रुग्णवाहिका घेऊन २८ रोजी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. त्यानुसार त्या महिलेस भरती करून घेत उपचार सुरु करण्यात आले होते.
त्या महिलेचे नमूने तपासणीला पाठविण्यात आले होते. दि. २९ रोजी रात्री कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता. या महिलेच्या तब्येती संबंधी प्रशासनाच्या वतीने यापूर्वीच काळजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले.

तरी आजची परिस्थिती पहाता नांदेड मध्ये अता म्रतांची संख्या दोन झाली असुन ग्रीन झोन मध्ये असलेले नांदेड रेड झोन मध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.