July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

बदनापुरच्या तहसिलदार श्रीमती छाया पवार निलंबित ,

*बदनापुरच्या तहसिलदार श्रीमती छाया पवार निलंबित*

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी

जालना-कोव्हीड19 या आपत्ती कालावधीमध्ये मुख्यालयी न राहणे तसेच औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणुचे बरेच रुग्ण आढळुन आलेले आहेत.अश्या स्थितीत जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत औरंगाबाद येथून बदनापूर ला ये जा करणाऱ्या तहसीलदार छाया पवार यांना 30 एप्रिल रोजी निलंबित करण्यात आल्याने रेड झोन मधून ये जा करणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे

जालना-कोव्हीड19 या आपत्ती कालावधीमध्ये मुख्यालयी न राहणे तसेच औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणुचे बरेच रुग्ण आढळुन आलेले आहेत त्यामुळे औरंगाबादचा समावेश रेडझोनमध्ये झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये औरंगाबाद येथुन ये-जा केल्यास जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड-19 विषाणुचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने तहसिलदार छाया पवार याांनी स्थियत मुख्यालयी राहून अत्यावश्यक कामे नियमितपणे पार पाडणे आवश्यक होते. मात्र तहसिलदार, बदनापुर मुख्यालयी राहत नसल्यामुळे कोव्हीड19 बाबतचे विविध अहवाल वरिष्ठ कार्यालयास विहित कालावधीमध्ये सादर न करणे, शासकीय कामात दुर्लक्ष करणे, दुष्काळी अनुदान मागणीत अनियमितता, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात दुर्लक्ष, अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणात अनियमितता, गौण खनिजाचे अनाधिकृत वाळुसाठे व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणे, शासकीय वसुलीमध्ये दुर्लक्ष करणे या कारणावरुन बदनापुरच्या तहसिलदार श्रीमती छाया पवार यांना आज दि. 30 एप्रिल, 2020 रोजी जिल्हाधिकारी, जालना यांनी निलंबित करत अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे.

निलंबनाच्या काळामध्ये श्रीमती पवार यांना उप विभागीय अधिकारी कार्यालय, जालना हे मुख्यालय देण्यात आलेले असुन तहसिलदार, बदनापुरचा पदभार पुढील आदेशापर्यंत नायब तहसिलदार (निवडणूक) दिलीप शेनफड सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!