Home सातारा लाॅक डाऊन ने शेतकर्‍यांच्या मालांचे लाखो रुपयाचे नुकसान

लाॅक डाऊन ने शेतकर्‍यांच्या मालांचे लाखो रुपयाचे नुकसान

142

शहरातील बाजारपेठा बंदमुळे शेतातील फळे लागली पिकायला

मायणी. ता. खटाव.जि. सातारा (सतीश डोंगरे) – खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरातील गावामध्ये अनेक शेतकर्‍यांनी भोपळा , कलिंगड, दुधी भोपळा, अशा प्रकारची पिके घेतलेली असुन लाॅक डाऊन मुळे शहरातील बाजारपेठा बंद आहेत.त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील फळे पिकायला लागली आहेत.

त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांच्या मालांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असुन याबाबत शासनाने लवकरात लवकर काहीतरी ठोस भुमिका घेऊन अशा फळांना बाजारपेठा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच या शेतकरी वर्गास आर्थिक विवंचनेतुन बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावरुन शेतकर्‍यांच्या पिकांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.

तरी या पिकांना एक एकरास उत्पादन खर्च एकरी चाळीस ते पन्नास हजाराच्या आसपास येत असुन तरी या पिकाचे उत्पन्न एकरी बारा ते पंधरा टनापर्यतचे मिळाले असते.त्यामुळे उत्पादन खर्च व मिळणारा नफा असा तोटा शेतकर्‍यांचा झालेला आहे.

सध्या लाॅकडाऊनच्या काळात अनेक शेतकर्‍यांना आपल्या पिकांचा उत्पादन खर्च ही निघालेला नाही त्यामुळे याबाबत राज्य सरकारने शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबतची पावले उचलावीत अशी म‍ागणी शेतकर्‍यांकडुन
होत आहे.

चौकट :

लाॅकडाऊनमुळे भोपळयाचे दर तीन ते चार रुपयेच्या घरात येऊन बसलेत. तसेच फळाची मागणी शहरी भागात जास्त असते. भोपळ्याचा वापर मोठया प्रमाणात हाॅटेल मध्ये वापरला जातो.

प्रतिक्रिया :

कोरोना सदृश्य परिस्थतीमुळे भोपळा जनावरांना घालावा लागला आहे.आणि राहिलेला भोपळ्यावर रोटर फिरवावा लागल्याने आम्हाला आर्थिक फटक‍ा बसला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने यावर उपाय योजना काढले गरजेचे आहे.

श्री.शंकर पिसाळ,
शेतकरी चोराडे.