Home विदर्भ अंदोरी येथे अंगणवाडी आशा ग्रा.प. कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांची कार्यशाळा.!

अंदोरी येथे अंगणवाडी आशा ग्रा.प. कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांची कार्यशाळा.!

147

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील गौळ प्राथमिक आरोग्य केंद्रा , अंतर्गत ग्राम पंचायत अंदोरी येथे १५ एप्रिल रोजी गाव कोरोणा विषाणू मुक्त करण्यासाठी करावयाची उपाय योजना यासाठी गावस्तरावरील काम करणारे अंगणवाडी सेविका.मदतनिस आशा आरोग्य कर्मचारी व ग्राम पंचायत कर्मचारी यांची कार्यशाळा सरपंच जयकुमार वाकडे यां उपस्थित शोशल डिस्टन्स ठेवून घेण्यात आली.
यावेळी आरोग्य सहाय्यक शरद डांगरे औषध निर्माण अधिकारी तुषार धाञक पोलीस पाटील हेमत ढाले ग्रामसेवक केवटे आरोग्य सेवक दिलीप उटाणे कार्यशाळेला उपस्थित होते.
अंदोरी गाव हे कोरोणा बाधीत यवतमाळ सिमालगत असल्यामुळे गावात बाधीत जिल्ह्यातील नागरिक येवू नये व वेळीच उपाय योजना करण्यात आल्या आहेत वर्धा नदीतून येणाऱ्या सर्व पायवाट बंद करण्यात आल्या .तरीपण नदी पाञातून लोक येण्याचा प्रयत्न करतात चला आपला कोरोणा मुक्त करुया असे प्रतिपादन सरपंच जयकुमार वाकडे यांनी केले.
कोरोणाला आळा घालणे हे फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून ग्राम पंचायत सदस्य व गावातील प्रत्येक नागरिकांची आहे *आरोग्य कर्मचारी पोलीस आपल्या कुटुंबाची पर्वा नकरता राञदिवस काम करीत आहेत* मग आपल्यासाठी कुटुंबासाठी *घरातच राहा जिल्हा बाहेरील कोणी गावात आलेतर माहिती देवून सहकार्य करा त्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज आहे असेही वाकडे म्हणाले*
सर्दि ताप खोकला घसा दुखणे इत्यादी लक्षणाचे सर्व्हेक्षण उद्या पासून आशा अंगणवाडी आरोग्य कर्मचारी करतील
*खरी माहीती गोळा करुन लक्षणे असणाऱ्या अति जोखमीच्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येईल व त्यांच्या कडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.*
*हे सर्व्हेक्षण आतंरव्यक्ती संवाद करुन चार प्रश्न विचारुन माहिती गोळा करण्यात येईल असे आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी सांगितले*
जिल्हा स्तरावरुन *मा.जिल्हाधिकारी विवेक भिमनवार .जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ पुरुषोत्तम मडावी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले इत्यादी जिल्हा स्तरीय अधिकारी वेळोवेळी सुचना करीत आहेत त्या सुचनेचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच आपल गांव कोरोणा मुक्त होईल यात शंका नाही असे दिलीप उटाणे यांनी सांगितले*
आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी कोरोणा विषाणूचा पादुर्भाव वाढत असल्यामुळे वेळीच उपाय योजना करण्यासाठी *कोरोणा व्हायरस दैनंदिन सर्व्हेक्षण* कोरोणा आजारावर मात करण्यासाठी *गाव कृती आराखडा* तयार करण्यात आला तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने तहसिलदार राजेश सरवदे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोहर बारापाञे पोलीस निरिक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात गाव स्तरावरील काम करणाऱ्याच्या सहकार्याने मोहीम राबविली जात आहे . त्याची पुर्व तयारी म्हणून हि कार्यशाळा सामाजिक अंतर (सोशल डिसन्टस) ठेवून करण्यात आली . असे सविस्तर मार्गदर्शन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले तसेच या संकटकाळात आशा आंगणवाडी कर्मचारी ग्राम पंचायत कर्मचारी यांनी करावयाचे कामा बद्दल शासन परिपञकाचे वाचन ग्रामसेवक जयन्द केवटे यांनी करुन* सर्व्हेक्षणासाठी एका टिम मध्ये २ कर्मचारी असणार असून एकूण ५ टिम तयार करण्यात आल्या आहे अंदोरी येथे ५३० कुटुंबातील लोकांची माहीती संकलीत करण्यात येईल.
या सर्व्हेक्षणाला मदत करण्यासाठी तलाठी पोलीस पाटील कोतवाल तसेच ग्राम पंचायत पदाधिकारी व सदस्य यांची मदत घेण्यात येईल असे जयन्द केवटे यांनी सांगितले तसेच गाव पातळीवर काम करणाऱ्याना कुणाला अडचण असल्यास तसे सांगावे जेणे करुन गाव हिताच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सोयीचे होईल ते पुढे म्हणाले जवळच कोरोणा बाधीत जिल्हा असून त्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी व शक्यतो आपल्या गावातील लोकांनी अशा बाधीत जिल्ह्यात जावू नये व इतरांना येवू देवू नये यासाठी सर्वानी खबरदारी घ्यावी आपल्यासाठी राञ दिवस काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व पोलीस यांनी दिलेल्या सुचनाचे पालन करा सहकार्य करा महत्त्वाचे काम नसेल तर आपल्या घरातच राहा.
कार्यशाळेत हात धुण्याच्या पध्दती प्रात्यक्षिक करण्यात आले.यावेळी ग्राम पंचायत सदस्य भास्कर भिमनवार गणेश जगताप कृष्णा मडावी अर्चना निरगुडे ज्योती वाकडे शोभा बावने ज्योषणा लोहकरे .अंगणवाडी कर्मचारी सुवर्णा झोटींग शिला गावंडे अरुणा रईच सिमा झामरे राणी बोनगीरवार रंजना काळमेघ संगिता हेडावू सुनिता वाकडे आरोग्य कर्मचारी माधव कातकडे शैलेश चौधरी हुसना बानो शेख प्रमिला नगराडे संतोष चौधरी यांची उपस्थिती होती.