July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व बँकांनी शेतकऱ्यांची रक्कम वाटप करतांना सामाजिक अंतर राखुनच, टोकन पद्धतीने कामे पार पाडावीत – जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड, दि. १४ ( राजेश भांगे ) – जिल्हायातील सर्व बँकांनी त्यांशनी त्यांदच्याि अधिनस्तं शाखांमधुन शेतकऱ्यांना वाटप करण्यालत येणारे शासकीय अनुदान व पिक विम्यााच्याी रक्कामा सामाजिक अंतर राखुनच, टोकन पध्दधतीचा वापर करुन, स्वयंसेवकांची मदत घेवून व वेळेचे नियोजन करुन सदर कामे पार पाडावीत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

नांदेड जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याेसाठी प्रतिबंधात्ममक उपायोजनेचा एक भाग म्हाणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्या साठी नांदेड जिल्हयातील सर्व बँकातुन होणारे पीक विमा, कर्ज वाटप व शासनाकडून देण्यात येणारे सर्व अनुदानाचे वाटप पुढील आदेशा पर्यंत बंद करण्‍याचे आदेशित करण्यात आले होते. बँकाचे इतर व्यवहार यापूर्वी दिलेल्या निर्देशांची काटे कोरपणे अंमल बजावणी करुन‍ नियमित पणे चालु राहतील असे सुचित करण्याेत आले होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक समस्याा विचारात घेवून ३१ मार्च २०२० रोजी देण्याहत आलेले आदेश रद्द करण्याात आला आहे.

जिल्हायातील सर्व बॅंकांनी त्यांच्या अधिनस्त शाखांमधुन शेतकऱ्यांना वाटप करण्यांत येणारे शासकीय अनुदान व पिक विम्यांच्या रक्कमा सामाजिक अंतर राखुनच, टोकन पध्दुतीचा वापर करुन, स्वकयंसेवकांची मदत घेवून व वेळेचे नियोजन करुन सदर कामे पार पाडावीत. ग्राहकांकडून सामाजिक अंतर राखण्यास सहकार्य मिळत नसल्यास संबंधित शाखेच्या शाखाधिकाय्राने नजिकच्या पोलीस स्टेशन कडून पोलीस सहकार्य घेवून कामकाज करावे. याशिवाय अत्यावश्यक नसलेली कामे (जसे, पास बुक नोंद करुन देणे, नवीन खाते उघडणे व इतर ) अशी कामे या काळात करण्या्त येवू नयेत. तसेच पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी जिल्हयातील जिल्हा बॅंकेच्या शाखांकडून याकामी पोलीस संरक्षणाची मागणी केल्या्स त्यांना नि:शुल्का पोलीस संरक्षण देणेसाठी जिल्हायातील सर्व पोलीस स्टेाशनला सुचित करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!