महत्वाची बातमी

अन लग्न सोहळा झालाच नाही ??? नवरा-नवरी आणि वधू वर पित्यांवर गुन्हा दाखल . या शिवाय मंडपवाला आणि पुरोहितावरही गुन्हा दाखल

Advertisements

अन लग्न सोहळा झालाच नाही ???

नवरा-नवरी आणि वधू वर पित्यांवर गुन्हा दाखल . या शिवाय मंडपवाला आणि पुरोहितावरही गुन्हा दाखल

अमीन शाह

लातूर : कोरोना पसरु नये म्हणून बंदी आदेश असतानाही वऱ्हाड्यांनी केलेल्या गर्दीमुळं लातुरातल्या एका लग्नात विघ्न आलंय. वऱ्हाड्यांच्या गर्दीत लातूरमध्ये लग्न लावणाऱ्या नवरा-नवरी आणि वधूवर पित्यांवर गुन्हा दाखल झालाय. या शिवाय मंडपवाला आणि पुरोहितावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
लातूर शहरातल्या सिग्नल कॅम्प परिसरात हे लग्न होतं. पोलिसांना लग्नाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश पायदळी तुडवून लग्न सुरु असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. शिवाय पोलिसांनी हे लग्नही थांबवलं.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६४वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या काही तासांमध्ये कोरोनाचे आणखी १२ रुग्ण आढळले आहेत. आज गुजरातमधून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एक जण विमानतळावरील कर्मचारी आहे आणि एक पुण्यातील महिला आहे.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...