
फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत शिरपूर शहरात श्री मिर्झा मियाँ यांचा उर्स उत्सव सुरू झालेला असून त्या निमीत्ताने मोठया प्रमाणात लोक उर्स मध्ये सहभागी होण्याकरीता शिरपूर शहरात आलेले आहेत. दिनांक 1/11/2025 रोजी सायंकाळी 07/30 वाजताचे सुमारास फिर्यादी नामे विशाल गोपाल देशमूख वय – 23 वर्षे, रा. शिरपूर हे त्यांचे मोटर सायकलने घरून शेताकडे जात असतांना बस स्टॅण्ड जवळील चौकात गर्दी असल्याने फिर्यादी / जखमी यांनी मोटर सायकलचा हॉर्न वाजविला त्यावेळी रस्त्याने जात असलेल्या 3 मुलांनी हॉर्न वाजविल्याचे कारणावरून फिर्यादी विशाल गोपाल देशमूख यांचे सोबत वाद करून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली आणि त्यापैकी एका मुलाने त्याचे कडील धारदार हत्याराने फिर्यादी यांचे पोटावर मारून त्यांना गंभीर जखमी केले आहे.फिर्यादी यांना तात्काळ उपचारा करीता अकोला येथे पाठविण्यात आले असून त्यांचेवर ओझोन हॉस्पीटल, अकोला येथे उपचारा सुरू आहेत. सदर घटनेबाबत तात्काळ घटनास्थळा शेजारील सिसिटीव्ही फुटेज पाहणी करण्यात आली तसेच घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार यांना विचारपूस करून सदर गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हयातील सहभागी आरोपीतांपैकी पोलीसांनी 01 आरोपीतास ताब्यात घेतल असून इतर आरोपीतांचा शोध सुरू असून इतरही आरोपीतांना लवकर ताब्यात घेवून योग्य कायदेशिर कार्यवाही करण्यात येत आहे. मा.पोलीस अधिक्षक अनुज तारे, मा. अपर पोलीस अधिक्षक लता फड मा. सहायक पोलीस अधिक्षक नवदीप अग्रवाल, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही ही स्थानीक गुन्हे शाखा, वाशिम आणि पोलीस स्टेशन शिरपूर यांनी सयुक्तीकपणे पो. नि. प्रदीप परदेशी स्थानीक गुन्हे शाखा, वाशिम, पो.नि.केशव वाघ, पोलीस स्टेशन शिरपूर, सपोनि जगदीश बांगर, पोउपनि शेखर मासकर, पोहेकॉ / 808 गजानन झगरे, पोकॉ/1344दिपक घुगे, पोकॉ / 136अमोल इरतकर, पोकॉ / 623 विजय नागरे, पोहेकॉ / मात्रे स्थागुशा तसेच सपोनि करूणाशिल तायडे, पोउपनि इम्रान पठाण,पोउपनि राहून चव्हाण, पोहेकॉ / 880 निखाडे,पोहेकॉ/1083 रामेश्वर जोगदंड, पोहेकॉ / 1091 गुरूदेव वानखेडे, पोहेकॉ / 1177 बालाजी महले ,पोकॉ/ 348 हरीहर गांवडे, पोकॉ / 1385 कैलास बळी, पोकॉ / 145 गणेश देशमुख, पोकॉ / 822 सतीष चव्हाण यांनी केलेली आहे.











































